
गडहिंग्लज : ग्रामदैवत श्री काळभैरव देवाच्या पालखी सोहळ्यात चोरट्यांनी आज धुमाकूळ घातला. अनेकांचे सोन्याचे चेन, महिलांचे मंगळसूत्र, मोबाईल आदी लाखो रुपयांच्या ऐवजावर चोरट्यानी डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. नागरिकांनी दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे सांगण्यात आले. परंतु, रात्री उशिरापर्यंत पोलिसांत या घटनेची नोंद नव्हती.