'श्री अंबाबाई'ची 'कौमारी' मातृका रूपात सालंकृत पूजा

टेंबलाई टेकडीवर कोहळा फोडण्याचा पारंपरिक विधी होणार आहे
'श्री अंबाबाई'ची 'कौमारी' मातृका रूपात सालंकृत पूजा
Updated on: 
Summary

उद्या ललिता पंचमीचा सोहळा साध्या पध्दतीनेच; टेंबलाई टेकडीवर कोहळा फोडण्याचा पारंपरिक विधी होणार

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज करवीर निवासिनी 'श्री अंबाबाई'ची कौमारी मातृका रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. यंदा उत्सवाच्या चौथ्या दिवशी म्हणजेच उद्या (रविवारी) ललिता पंचमी असून यानिमित्ताने अंबाबाई टेंबलाईच्या भेटीसाठी जाणार असून टेंबलाई टेकडीवर कोहळा फोडण्याचा पारंपरिक विधी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत छत्रपतींच्या उपस्थितीत मोजक्याच लोकांच्या साक्षीने हा सोहळा होणार आहे. तत्पूर्वी अंबाबाई, तुळजाभवानी आणि गुरूमहाराज वाड्यातील पालख्या वाहनातूनच टेंबलाई टेकडीवर येणार आहेत. (kolhapur ambabai worship kaumari matruka)

'श्री अंबाबाई'ची 'कौमारी' मातृका रूपात सालंकृत पूजा
'श्री अंबाबाई'ची माहेश्वरी मातृका रूपात सालंकृत पूजा

उत्सवात 'श्री अंबाबाई'च्या सप्तमातृका या संकल्पनेवर पूजा बांधल्या जात आहेत. कौमारी ही देवांचा सेनापती, युध्ददेवता कार्तिकेयाची शक्ती आहे. तिला कुमारी, कार्तिकी किंवा अंबिका म्हणूनही ओळखले जाते. ती मोरावर स्वार असून तिच्या हातात भाला, कुऱ्हाड, टाक आणि धनुष्य असल्याची माहिती श्रीपूजक मयुर मुनीश्वर, सोहम मुनीश्वर आणि सुकृत मुनीश्वर यांनी दिली.

'श्री अंबाबाई'ची 'कौमारी' मातृका रूपात सालंकृत पूजा
पहिल्या दिवशी 'अंबाबाई'ची ब्रम्हाणी रूपात सालंकृत पूजा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Ambabai Temple musical lights not working
Chandrakant Patil warning to Satej Patil
Kolhapur Ambabai Temple
Satej Patil Gokul election allegations
Marathi News Esakal
www.esakal.com