पॉलिटेक्‍निकच्या तृतीय वर्षाची परीक्षा होणार ऑनलाईन, "या' महिन्यात परीक्षा शक्‍य

Third Year Polytechnic Exam Will Be Online Kolhapur Marathi News
Third Year Polytechnic Exam Will Be Online Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : पॉलिटेक्‍निक अंतिम वर्षाच्या परीक्षेची तयारी सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची संख्या व इतर माहिती संस्थांकडून मागविण्यात आली आहे. या परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. पुढील महिन्यात या परीक्षा होण्याची शक्‍यता आहे. याबाबत सविस्तर वेळापत्रक, परीक्षेची माहिती महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे. 

दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात पॉलिटेक्‍निकच्या परीक्षा होतात. मात्र, यंदा कोरोनामुळे मार्चपासूनच शैक्षणिक कामकाज बंद झाले. दुसरी चाचणी परीक्षाही पूर्ण झाली नाही. शेवटच्या ठप्यात राहिलेला अभ्यासक्रमही ऑनलाईन पूर्ण करण्यात आला.

लॉकडाउनमुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार वर्षभरातील आढावा आणि यापूर्वीची कामगिरी याच्या आधारे पहिल्या, दुसऱ्या वर्षांचा निकाल लावण्यात आला. केवळ तृतीय वर्षाचा निर्णय प्रलंबित होता; परंतु सर्वोच्च न्यायालयाने सर्वच अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे तृतीय वर्षाच्या परीक्षेचा मार्ग मोकळा झाला. 

दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच अभ्यासक्रमाच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना घरातून बाहेर पडायला लागू नये, असा शिक्षण विभागाचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी ऑनलाईनचा पर्याय पुढे आला आहे. त्यासाठी तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची संख्या संस्थेकडून मागविण्यात आली आहे.

यापूर्वी प्रात्यक्षिक, लेखी असे परीक्षेचे स्वरुप होते. वाढत्या कोरोनामुळे विद्यार्थी एकत्र येणे ही बाब सध्या अडचणीची आहे. परिणामी, ऑनलाईन परीक्षेचा मार्ग सुरक्षित असल्याने याच पध्दतीने परीक्षा घेण्यावर तंत्रशिक्षण मंडळाने पसंती दिली आहे. याचे स्वरूप, वेळापत्रक याची माहिती मंडळातर्फे पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. 

परीक्षा अर्जासाठी आज मुदत 
तृतीय वर्ष परीक्षेसाठी अद्याप अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यासाठी तंत्रशिक्षण मंडळाने पुन्हा संधी उपलब्ध केली आहे. अशा विद्यार्थ्यांनी तातडीने आपल्या लॉग इन आयडीतून अर्ज भरायचा आहे. त्यासाठी उद्या (ता. 11) शेवटची मुदत आहे. त्यानंतर आपपल्या संस्थेशी संपर्क साधून तो अर्ज कन्फर्म करायचा आहे. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sahyadri Express
Kolhapur flood situation latest
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Marathi News Esakal
www.esakal.com