IMD : मध्य महाराष्ट्र, कोकणात आज पावसाची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाची शक्यता

IMD : मध्य महाराष्ट्र, कोकणात आज पावसाची शक्यता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पूर्व-मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यात ढगाळ वातावरण आणि विविध भागांत पाऊस पडत आहे. सोमवारी (ता. २२) मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात काही भागांत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा: 'कबूल, कबूल, कबूल', मलिकांनी मध्यरात्री टाकला बॉम्ब; वानखेडेंची झोप उडणार?

राज्यात रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस, तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. सर्वाधिक किमान तापमान १७.९ अंश सेल्सिअस महाबळेश्‍वर येथे नोंदले गेले, तर उच्चांकी तापमानाची नोंद ३५.४ अंश सेल्सिअस सांताक्रूझ येथे झाली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या खालीच आहे, तर कोकण आणि विदर्भात कमाल तापमान अधिक असल्याचे दिसून आले.

loading image
go to top