
Kolhapur Friends : चिऱ्याची वाहतूक करणारा ट्रक आणि उसाची रोपे घेऊन जाणारी मोटार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात शिरोळ तालुक्यातील दोघे मित्र ठार झाले, तर या दोन्ही वाहनांतील अपघातग्रस्त लोकांना मदतीसाठी गेलेल्या आणखी एकाला मोटारीने उडविल्याने तोही ठार झाला. हा अपघात कागवाड-विजापूर मार्गावर अथणीजवळील बनजवाड महाविद्यालयाजवळ गुरुवारी (ता. १२) मध्यरात्रीनंतर घडला. त्यात चौघे जखमी झाले आहेत. शुभम युवराज चव्हाण (वय २४, रा. कुटवाड, ता. शिरोळ), महेश सुभाष गाताडे (३०, रा. गणेशवाडी, ता. शिरोळ) आणि सचिन विलास माळी (४२, रा. कवलापूर, ता. मिरज) अशी मृतांची नावे आहेत.