आजचा दिवस कुतिन्हो कुटुंबीयांच्या जीवनात अतिशय वाईट ठरला. नाताळनिमित्त एकत्रित आलेले नातेवाईक, पाहुणे मंडळी यांच्या आनंदावर विरजण पडले.
आजरा : आजरा शहरापासून अर्धा किलोमीटरवरून वाहणाऱ्या चित्री नदीवरील (Chitri River) परोली बंधाऱ्यामध्ये बुडून तिघांचा मृत्यू झाला. अॅड. रोझारिओ अंतोन कुतिन्हो (वय ४०), फिलीप अंतोन कुतिन्हो (३६) या सख्ख्या भावांसह लॉईड पास्कोन कुतिन्हो (३६) अशी त्यांची नावे आहेत.