ट्रॅक्टरखाली सापडून तीन वर्षाची बालिका जागीच ठार; चालकाच्या निष्काळजीमुळे शिवन्याच्या डोक्यावरून चाक गेले अन्..

Tractor Accident Kagal : ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या उजव्या बाजूच्या पाठीमागील चाकामध्ये शिवन्या सापडली. तिच्या डोक्यावरूनच चाक गेल्याने ती जागीच गतप्राण झाली. शिवन्या ही एकुलती एक मुलगी होती.
Tractor Accident Kagal
Tractor Accident Kagalesakal
Updated on

मुरगूड : सोनगे (ता. कागल) येथे एका तीन वर्षीय बालिकेचा ट्रॅक्टरखाली सापडून दुर्देवी मृत्यू (Tractor Accident) झाला. शिवन्या विजय चिंदगे (रा. सोनगे, ता. कागल) असे तिचे नाव आहे. या घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत (Murgud Police) झाली आहे. चालक दिग्विजय विनायक कळंत्रे (वय ३५, रा. सोनगे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com