गोपाळ व डवरी समाजावर उपासमारीची वेळ 

गोपाळ व डवरी समाजावर उपासमारीची वेळ 
Updated on

कोल्हापूर : गोपाळ आणि डवरी समाज म्हणजे मोलमजुरी करणारा, बेंजो आणि बॅंडच्या माध्यमातून साऱ्यांच्याच मंगलकार्यात आवर्जुन भेटतो, तसाच भंगार वेचून ते विकणारे, भंगारचाच व्यवसाय करणारी मंडळी आणि मिळेल ती कामे करून उदरनिर्वाह करणारे हे समाज. मात्र, लॉकडाउनच्या काळात या दोन्ही समाजांवर उपासमारीची वेळ आली.

कारण रोजच्या कमाईतूनच समाजातील बहुतांश जणांची कुटुंबं आजही चालतात. पण, सारेच बंद त्यामुळे त्यांच्या घरची चूलबंद अशी परिस्थिती या समाजावर ओढवली. समाजाच्या विविध संघटनांच्या माध्यमातून शक्‍य तेवढी मदत या समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न झाला. पण, आता या समाजांना प्रतीक्षा आहे ती लॉकडाउन पूर्णपणे संपण्याची. सर्व व्यवहार सुरळीत झाले तरच त्यांना खऱ्या अर्थाने रोजगार मिळणार आहे आणि त्यानंतरच त्यांची चूल पेटणार आहे. 
गोपाळ समाजाचा विचार केला तर जिल्ह्यातील बहुतांश गावात कमी-अधिक प्रमाणात हा समाज आहे. जिल्ह्यातील या समाजाची लोकसंख्या दहा हजाराच्या आसपास तर डवरी समाजाची पाच ते सहा हजाराच्या आसपास. गोपाळ समाजातील बहुतांश तरुण बेंजो आणि बॅंड पथकातून कार्यरत आहेत. मात्र, लग्न आणि इतर सर्वच सार्वजनिक कार्यक्रम बंद असल्याने त्यांचा एकूणच हंगाम वाया गेला आहे. या समाजाचा विचार केला तर घरातील महिलाच या कुटुंबाची खऱ्या अर्थाने कर्ती असते. त्यातही 10 ते 15 टक्के विधवा महिलांचे प्रमाण आहे. त्यामुळे सारीच जबाबदारी त्यांच्यावर असते. शासनाकडून रेशन मिळाले. पण, त्याशिवाय जिल्हा प्रशासनाकडे जी मदत जमा होते त्यातील काही मदत या समाजाला मिळावी, अशी मागणीही भटका समाज मुक्ती आंदोलन संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. 

जिल्ह्यातील काही ठिकाणी आम्ही मदत पोचवली. त्याशिवाय वडगाव परिसरात समाज मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे संघटनेने अडीचशे किलो तांदूळ नगरपरिषदेकडे दिला आणि विविध अकरा जीवनावश्‍यक वस्तूंची किट समाजातील गरजूंपर्यंत पोचवली. 
- भीमराव साठे, भटका समाज मुक्ती आंदोलन 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com