करवीर निवासिनी अंबाबाई, जोतिबाच्या दर्शनाची वेळ वाढविली

time increase to kolhapur ambabai and jotiba temple
time increase to kolhapur ambabai and jotiba temple
Updated on

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिरासह पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीतील मंदिरे आता दररोज अकरा तास भाविकांसाठी दर्शनासाठी खुली राहणार आहेत. सकाळच्या सत्रात दोन तासांनी वेळ वाढवली असून, आता सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. सायंकाळच्या सत्रातही एक तास वेळ वाढविली असून सायंकाळी चार ते रात्री आठ या वेळेत दर्शन मिळेल. दरम्यान, याबाबतचा निर्णय आज देवस्थान समितीच्या मासिक बैठकीत घेण्यात आला. याची अंमलबजावणी शुक्रवार (ता. 11) पासून केली. 

आठ महिन्यांनंतर दिवाळी पाडव्यादिवशी मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली केली. त्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक खबरदारी घेऊनच भाविकांना दर्शन दिले जात आहे. पहिल्या टप्प्यात सकाळच्या सत्रात सात ते दुपारी बारा या वेळेत भाविकांना दर्शन दिले गेले. आता ही वेळ तीन तासांनी वाढवली आहे. 

अंबाबाई मंदिरासोबत दख्खनचा राजा जोतिबा, दत्त भिक्षालिंग, ओढ्यावरील सिध्दीविनायक, बिनखांबी गणेश मंदिर, त्र्यंबोली या मंदिरातील दर्शन वेळही वाढविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

भाविकांना मंदिरात ओटी साहित्य नेता येणार आहे. तसेच भाविकांसाठी बंद असलेले अभिषेक उद्यापासून पूर्ववत सुरू करण्याचा निर्णयही बैठकीत झाला. देवस्थान समितीचे अधिपत्याखाली येणाऱ्या बाकीच्या मंदिराच्या वेळेसंदर्भात स्थानिक उपसमिती निर्णय घेईल, अशी माहिती पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व समितीच्या सदस्यांनी दिली. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Hasan Mushrif hospital inspection Kolhapur
Kalamba resident dies in highway accident
Kolhapur college student death investigation
Bhose Khind Murder Case
Marathi News Esakal
www.esakal.com