खाजगीकरणाच्या विरोधात राष्ट्रीयकृत बॅंकांचा आज आणि उद्या संप

अधिकारी कर्मचार्‍यांची निदर्शने ; रोज 750 कोटी ची उलाढाल थांबणार
खाजगीकरणाच्या विरोधात राष्ट्रीयकृत बॅंकांचा आज आणि उद्या संप
Updated on

कोल्हापूर : निजीकरण धोका आहे, बँक बचालो मोका है, यासह इतर घोषणाबाजी करून राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष्मीपुरी येथील बँक ऑफ इंडियाच्या(bank of india) शाखेसमोर आज सकाळी निदर्शने केली. आज आणि उद्या दोन दिवस खाजगीकरणाच्या विरोधात राष्ट्रीयीकृत बँकांनी बंद पुकारला आहे. यामुळे कोल्हापूर(kolhapur) जिल्ह्यातील सुमारे साडेसातशे कोटींची रोजची उलाढाल थांबणार आहे.

जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी- कर्मचारी दोन दिवस संपावर गेले. लक्ष्मीपुरी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर सुमारे साडेचार 500 अधिकारी- कर्मचारी एकत्र येऊन त्यांनी घोषणाबाजी केली. राष्ट्रीयीकृत बँकेचे खाजगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. तो हाणून पडण्यासाठी आज युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉईज तर्फे राज्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी बंद पाळून कर्मचारी संपावर गेले.

खाजगीकरणाच्या विरोधात राष्ट्रीयकृत बॅंकांचा आज आणि उद्या संप
मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकानं नष्ट केले 14 कोटींचे अमली पदार्थ

दिग्दर्शनाच्या ठिकाणी सुहास शिंदे, विकास देसाई, प्रमोद शिंदे, संजय उलपे, सूर्यकांत कार्तिक, रवींद्र गरुड, कामगार नेते अतुल दिघे यांनी कर्मचाऱ्यांसमोर भूमिका मांडली. बँक खाजगीकरण झाल्यास सर्वसामान्य ग्राहकांना बँकांच्या दारात उभे करून घेतले जाणार नाही. त्यामुळेच संपाचे हत्यार काढावे लागले असल्याचे सांगितले. तसेच दोन दिवस बंद ठेवून योग्य निर्णय होत नसेल तर बेमुदत बंद करण्याचा इशारा दिला जाईल, आशा भावना ही अधिकारी आणिकर्मचारी व्यक्त केल्या.

खाजगीकरणाच्या विरोधात राष्ट्रीयकृत बॅंकांचा आज आणि उद्या संप
पुणे : पीएमपीमध्ये चोरी करणाऱ्यास अंमली पदार्थ विरोधी पथकाकडुन अटक

दरम्यान आज आणि उद्या असलेल्या संपात जिल्ह्यातील बारा राष्ट्रीयीकृत बँका आणि त्यांच्या 227 शाखांमधील सुमारे अडीच हजार अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत. दोन दिवस काम बंद राहणार आहे. यामुळे रोज सुमारे साडेसातशे कोटी रुपयांची उलाढाल थांबणार आहे. जिल्ह्यातील इतर बँका सुरू असल्या तरीही क्लिअरिंग हाऊस राष्ट्रीयीकृत बँकांकडे असल्यामुळे या बँकांमधील व्यवहारावर ही परिणाम होणार असल्याचे विकास देसाई आणि प्रमोद शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur illegal abortion investigation
Radhanagari Dam 100 percent full
Radhanagari Dam 97 percent full update
Girish Mahajan latest statement on Almatti Dam
Marathi News Esakal
www.esakal.com