
गगनबावडा येथे श्रीराम नवमीचा सोहळा उत्साहात
00313
गगनबावडा : येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यासाठी झालेली भाविकांची गर्दी.
गगनबावड्यात अपूर्व उत्साह
गगनबावडा, ता.10 : ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला पंत अमात्य बावडेकर सरकार यांच्या जहागिरीतील सोहळा अशी ओळख असलेला गगनबावडा येथील श्रीराम नवमीचा सोहळा आज अपूर्व उत्साहात संपन्न झाला.
रामनवमीनिमित्त मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी श्रीमूर्तीस अभिषेक, पूजा, पालखीची ग्रामप्रदक्षिणा आदी कार्यक्रम झाले. त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात श्रीराम जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा झाला. भाविकांनी पाळण्यावर पुष्पवृष्टी केली. श्रीरामाचा पाळणा योगिनी कुलकर्णी व वैदेही पाध्ये यांनी गायिला. राधिका कालेकर यांनी राम जन्माचे किर्तन तर संतोष राऊत यांनी भजनसेवा सादर केली. पौराहित्य श्रीकृष्ण पाध्ये यांनी केले. भाविकांना सुंठवडा व महाप्रसादाचे वाटप केले. हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. उत्सव कमिटीच्यावतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार झाले.
डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन बंडोपंत कोटकर, पी. जी. शिंदे, रमेश माने उपस्थित होते. स्वागत व सूत्रसंचालन निमंत्रक नंदकुमार पोवार यानी केले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..