परीस्थितीशी हार न मानता ध्येयाकडे वाटचाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परीस्थितीशी हार न मानता ध्येयाकडे वाटचाल
परीस्थितीशी हार न मानता ध्येयाकडे वाटचाल

परीस्थितीशी हार न मानता ध्येयाकडे वाटचाल

sakal_logo
By

00311

-----
परीस्थितीशी हार न मानता ध्येयाकडे वाटचाल
नृसिंहवाडीतील शरीरसौष्ठवपटू ऋषिकेश वगरेचा संघर्ष; भारत श्री चे स्वप्न

जितेंद्र आणुजे ः सकाळ वृत्तसेवा
नृसिंहवाडी, ता. 2४ ः जिद्द, चिकाटी व दुर्दम्य इच्छाशक्ती, परिस्थितीपुढे हार न मानता यशाची शिखरे येथील शरीरसौष्ठवपटू ऋषिकेश वगरे पादक्रांत करत आहे. भारत श्री बनण्याचे त्याने स्वप्न उराशी बाळगले आहे. त्यादृष्टीने त्याची वाटचाल सुरू आहे.
रहाण्यासाठी घर नाही. एक गुंठा शेत जमीनही नाही. वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांचे छत्र हरवलेले. आई दवाखान्यात परिचारिकेचे काम करते. मामाच्या घरी आश्रय घेतला आहे. तेथेही हलाखीची परिस्थिती. परंतू या सर्वांपुढे हा न मानता त्याची दिनचर्या पहाटेपासून सुरू होते. सकाळी तीन तास शरीर मसलसराव त्यानंतर कॉलेज. संध्याकाळी कवठेगुलंद येथे जीममधल्या मुलांना शरीरसौष्ठवचे धडे देत तो ध्येय गाठण्यासाठी संघर्षाच्या वाटेवरून त्याचा प्रवास सुरू आहे. त्याच्या महिन्याचा खुराकाचा व इतर गोष्टीचा साधारण वीस हजार आहे. ही आर्थिक बाजू जमवण्यासाठी त्याला अशाप्रकारे मेहनत घ्यावी लागत आहे. एखाद्या मंगल कार्यालयात जेवण वाडपीच्या कामापासून ते जिममध्ये खेळाडूंना कोचचे काम करत खर्चाला हातभार लावतोय.
परिस्थितीने खचून न जाता व परिस्थितीला दोष न देता या ध्येयवेड्या तरुणाने शरीरसौष्ठवमध्ये पश्चिम महाराष्ट्रात आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. नुकतेच चोकाक व गारगोटी येथे पश्चिम महाराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ७० किलो वजनी गटात व गारगोटी व चोकाक श्री होण्याचा बहुमान या पटकावला आहे. त्यापूर्वी राज्यस्तरीय १३ आणि पश्चिम महाराष्ट्रात २५ हून अधिक बहुमान पटकावले आहेत. दोन वर्षांपूर्वी ज्युनिअर भारत श्री व गेल्याच महिन्यामध्ये ऑल इंडिया युनिव्हर्सिटी रौप्यपदकाची चांदीची ढाल पटकावली आहे. त्याच्या या वाटचालीत क्रीडा कोच शिवप्रसाद सातपुते (इचलकरंजी), नृसिंहवाडीचे क्रीडा कोच उदय कुलकर्णी, दत्तराज चारीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव पुजारी, आई श्रीमती वैशाली वगरे, आजोबा श्रीपती भोसले व आजी मंगल भोसले, मामा सचिन भोसले यांचे सहकार्य लाभले आहे.
----------
जीवनाच्या वाटचालीत संकटे येत राहतात. त्यावर ते आपण जिद्द व चिकाटीने मात करायला शिकले पाहिजे. भविष्यात भारत श्री व एशिया श्री चा किताब शरीरसौष्ठवपटू म्हणून पटवायचे स्वप्न आहे.
-ऋषिकेश वगरे, शरीरसौष्ठवपटू, नृसिंहवाडी

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top