
पा३
गव्याच्या हल्ल्यात
पाटपन्हाळ्याचा शेतकरी जखमी
बाजारभोगाव, ता. १०: पोंबरे पैकी चव्हाणवाडी (ता. पन्हाळा) येथे शेतात गेलेल्या हिंदूराव केरबा पाटील (वय ५५, पाटपन्हाळा) या शेतकऱ्याच्या पोटात गव्याने शिंग खुपसल्याने गंभीर जखमी झाले. कोथळा बाहेर पडल्याने त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया झाली. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कोपार्डे (ता. करवीर) येथील चंद्रकांत पाटील यांची पोंबरे पाटबंधारे प्रकल्पाशेजारी '' रेवा'' नावाची शेतजमीन आहे. हिंदूराव पाटील यांच्याकडे ही जमीन कसण्यासाठी आहे. आज दुपारी शेताकडे जात असताना मागून अचानकपणे आलेल्या गव्याने हिंदूराव यांच्यावर हल्ला चढवला. त्यांच्या पोटात शिंग खुपसले. ते गंभीर जखमी स्थितीत विव्हळत पडलेले असतानाच तेथे शेळ्या चारण्यासाठी आलेल्या चव्हाणवाडी येथील बाळू कातळे, राजू बुकम यांनी त्यांना जीपमधून येथे पोहाळे येथे आणले व तेथून १०८ रुग्णवाहिकेतून कोल्हापुरतील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, मानवाचे वनपाल अतुल मगदूम, वनरक्षक सुनील कांबळे, पूजा नरुटे आदी तातडीने सीपीआरमध्ये पोहोचले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..