इंदोरी सोसायटी निवडणूक बिनविरोध
sakal

इंदोरी सोसायटी निवडणूक बिनविरोध

नामदार हसन मुश्रीफ यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची प्रचीती

इंदोरी, ता.१३ : भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समझोता झाल्याने इंदोरी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होऊन परंपरा कायम राखली.
१३ जागांपैकी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येकी सहा जागा घेतल्या. भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गासाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने सदरची जागा रिक्त राहिली आहे. दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी समझोता करून निवडणूक बिनविरोध करण्यात यशस्वी झाले. दोन्ही पक्षांनी समसमान ६-६ जागा घेतल्या आहेत. अध्यक्ष व
उपाध्यक्ष पद दरवर्षी आलटून पालटून घेण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजप चे जगन्नाथ शेवकर, प्रशांत ढोरे, संदीप काशिद, सुनील चव्हाण, संदीप नाटक, रमण पवार, दीपक राऊत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल शिंदे, जयंत राऊत, बबनराव ढोरे, दिलीप ढोरे, प्रशांत भागवत, रमेश घोजगे, निवृत्ती ढोरे यांनी प्रयत्न केले.
सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही.जे. तळपे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
बिनविरोध निवड झालेले उमेदवार-
सर्वसाधारण कर्जदार गट : प्रवीण ज्ञानोबा भापकर, आबासाहेब
ज्ञानेश्वर काशीद, निवृत्ती तुकाराम हिंगे, विठ्ठल बाळू ढोरे, अशोक
ज्ञानोबा मराठे, मनोहर महादू काशिद, दिलीप नामदेव ढोरे, श्रावण
चिलाजी शिंदे
महिला प्रतिनिधी : अरुणा जनार्दन भेगडे, सुलोचना सहादू काळे
अनु.जाती जमाती : पोपट दादू खुडे
इतर मागास प्रवर्ग : दीपक रघुनाथ शेवकर

एवढा मोठा व्याप सांभाळताना त्यांच्या राजकीय परिपक्वतेची परिपूर्ण जाणीव होते. कागलसारख्या संवेदनशील तालुक्यात सलग पाच वेळा आमदार होणे ही सोपी बाब नाही. यातच त्यांच्या कुशल नेतृत्वाची आणि काम करण्याच्या पद्धतीची प्रचीती येते. काम करताना त्यांनी जपलेली निरपेक्षता मनाला भावणारी आहे. गट, जात-पात या बाबींचा विचार न करता येणाऱ्या प्रत्येक माणसाला न्याय देण्याची त्यांची भूमिका खरोखरच कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे साहेबांकडे एक वेगळं राजकीय स्कील आहे. कोणत्या वेळी काय करायला हवं याचं परफेक्ट टायमिंग त्यांच्याकडे आहे. त्यामुळे विरोधक गणिताची मांडणी करेपर्यंत त्यांचं गणित सोडवून तयार असतं. अर्थात त्यांच्या राजकीय यशस्वीतेचं खरं कारण हे त्यांच्या आत्यंतिक तळमळीने काम करण्याच्या पद्धतीत आहे. दलित, वंचित, रुग्ण, निराधार, विधवा आणि कामगार या सर्वांच्या बाबतीत त्यांनी ज्या पद्धतीने काम केले आहे, त्याचे संपूर्ण राज्यभर कौतुक झाले आहे. त्यामुळेच त्यांचे नेतृत्व संपूर्ण राज्यभरात कुतूहलाचा विषय आहे. सध्याच्या राजकारणात २५-३० वर्षे कायमपणे स्वतःला एका उंचीवर ठेवणे व एक अढळ स्थान निर्माण करणे ही सोपी गोष्ट नाही. एकंदरीत अफाट कार्यक्षमता आणि राजकीय दूरदृष्टीच्या बाबतीत मंत्री मुश्रीफ यांना नक्कीच एका वेगळ्या उंचीवर मोजावे लागते. विशेष म्हणजे गोरगरीब जनतेला त्यांनी आत्यंतिक तळमळीने काम करून आपलेसे केले आहे. त्यामुळे भविष्यातही हे नेतृत्व नक्कीच यशाची नवनवी शिखरे गाठणार यात शंका नाही. अशा या सदाबहार नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

- नानीबाई चिखली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com