पान २

पान २

Published on

01611
बांबवडे ः येथे बूथ मेळाव्यात बोलताना माजी मंत्री दिवाकर रावते. शेजारी सत्यजित पाटील, अरुण दुधवडकर, मुरलीधर जाधव आदी.


शिवबंधन बांधून कामाला लागा

दिवाकर रावते; बांबवडेत शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा

बांबवडे, ता.२४ ः कोल्हापूर जिल्ह्यातील सहा आमदारांचे वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी शिवसैनिकांनी हातात शिवबंधन बांधून कामाला लागावे, असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी मंत्री दिवाकर रावते यांनी केले. येथे झालेल्या शिवसेनेच्या बूथप्रमुख व कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.
माजी आमदार सत्यजित पाटील, मुंबई-कोल्हापूर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा अध्यक्ष मुरलीधर जाधव प्रमुख उपस्थित होते.
रावते म्हणाले, ‘‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घालून दिलेल्या रचनेप्रमाणे काम करा, पद, प्रतिष्ठा, सन्मान न मागता मिळून जाईल. लोकांच्या समस्या ओळखून त्या सोडवा. अनेक घाव सोसल्याशिवाय कार्यकर्ता घडत नाही. कोरोनाकाळात धारावीचे मॉडेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले, याचा तळागाळातील लोकांसाठी उपयोग करुन घ्या.’’ माजी आमदार सत्यजित पाटील म्हणाले, ‘‘यापुढे ज्या ज्या निवडणुका लढवायच्या त्या जिंकण्यासाठीच लढवायच्या आहेत. लोकांची गर्दी उपयोगाची नाही तर दर्दी कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली पाहिजे.’’ यासाठी बूथप्रमुख ते जिल्हाप्रमुखांपर्यंच्या सर्व कार्यकर्त्यांना पक्षाने न्याय न्याय द्यायला हवा.
यावेळी जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी, जि. प. सदस्य हंबीरराव पाटील, तालुकाप्रमुख दत्ता पवार, शाहूवाडी संपर्कप्रमुख आनंद भेडसे, उपसभापती पांडुरंग पाटील, दिनकर लोहार, अण्णासो भिलोरे, महिला आघाडीप्रमुख मंगला चव्हाण आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com