शिकार प्रकरणी चौघांना तीन दिवस वनकोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिकार प्रकरणी चौघांना तीन दिवस वनकोठडी
शिकार प्रकरणी चौघांना तीन दिवस वनकोठडी

शिकार प्रकरणी चौघांना तीन दिवस वनकोठडी

sakal_logo
By

१६३०

शाहूवाडीत गेळ्याची शितकार
गस्ती पथकाने तिघांना पकडले; मांसासह बंदूक, जप्त
सकाळ वृत्तसेवा
आंबा, ता. ७ : येथील राखीव वनक्षेत्रात पिशेरा (गेळा) या हरणाच्या दुर्मिळ प्राण्याची शिकार केलेल्या तिघांना वनविभागाच्या गस्ती पथकाने छापा टाकून ताब्यात घेतले. या प्रकरणी सुनील शंकर हातणकर (वय ३८, तळवडे), दीपक दत्तात्रय तावरे (३६), गणपती सीताराम मोळे (५० तिघेही केर्ले, ता. शाहूवाडी) अशी त्यांची नावे आहेत. तर संदीप शामराव जाधव (४०, केर्ले, ता. शाहूवाडी) हा पसार झाला आहे. तिघांना तीन दिवसांची वनकोठडी दिली. शिकार करून घरी परतत असताना तळवडे येथे छापा टाकून ही कारवाई केली.
बुधवारी रात्री चौघे जण बंदूक घेऊन आंबा व घाट परिसरातील सहाच्या सुमारास वनविभागाच्या गस्ती पथकाने गावाजवळ पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले. ते जंगलात शिकारीस गेले होते. पहाटेच्या सुमारास पिशेराची शिकार करून ते कोकणातून परतत असताना शिकार केलेल्या पिशेराचे मांस, बंदूक, सत्तूर व मोटार जप्त केली.
पथकात मलकापूरचे परिक्षेत्र वन अधिकारी अमित भोसले, वनरक्षक विठ्ठल खराडे, गारदी, परीट, दिग्विजय पाटील, सुरेश कांबळे सहभागी होते.

निसर्गप्रेमींतून संताप
आठवड्यापूर्वी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे जंगलात शिकार करणाऱ्या तिघांवर केलेल्या कारवाईची घटना ताजी असतानाच या तरुणांनी केलेले कृत्य वन्यजीवांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. इको सेन्सिटिव्ह झोन असतानाही चोरटी शिकार होतेच कशी याबाबत निसर्गप्रेमीतून संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..