कुंभीवर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलची हत्तीवरून मिरवणूक आणि सत्कार

कुंभीवर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलची हत्तीवरून मिरवणूक आणि सत्कार

Published on

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजची
उद्या हत्तीवरून मिरवणूक
--
कुंभी -कासारी समुहातर्फे सत्कार सोहळा

कुडित्रे, ता. १२ ः कुंभी कासारी साखर कारखाना, कुंभी कासारी सहकारी बँक, आणि कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे देवठाणे (ता.पन्हाळा) येथील जागतिक कुस्तीपदक विजेता आणि महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी पृथ्वीराज पाटील यांचा १५ एप्रिल दुपारी चार वाजता सत्कार सोहळा आणि हत्तीवरून मिरवणूक काढणार आहे. अशी माहिती माजी आमदार, अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी पत्रकार बैठकीत दिली.
श्री. नरके म्हणाले, सातारा येथे झालेल्या ६४ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने मुंबईच्या विशाल बनकर यास पाच विरुद्ध चार गुणांनी पराभूत करून महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली. पृथ्वीराज २०१८/१९ या खुल्या गटातील कुंभी कारखान्याचा मानधनधारक पैलवान आहे.
कुंभी कुस्ती संकुलमधील सुवर्णपदक व कास्यपदक मिळवलेल्या मल्लात विजय पाटील सुवर्णपदक, सुशांत तांबूळकर सुवर्णपदक,अतुल चेचर कास्यपदक, स्वप्नील पाटील कास्यपदक, भगतसिंह खोत कास्यपदक, प्रवीण पाटील कास्यपदक मिळाले आहे. श्री.नरके यांनी यावेळी कारखाना कार्यक्षेत्रातील पैलवानने महाराष्ट्र केसरीचा किताब मिळाल्यास त्याची हत्तीवरून मिरवणूक काढू, असा मनोदय व्यक्त केला होता. त्याप्रमाणे पृथ्वीराज यांची १५ एप्रिल रोजी सांगरुळ फाटा ते कारखाना कार्यक्षेत्रात पर्यंत हत्तीवरून मिरवणूक काढणार आहे. यानंतर शेतकरी भवन येथे सत्कार सोहळा होणार आहे ,अशी माहिती दिली. पृथ्वीराजने यापुढे ऑलिम्पिकचे अभिलाषा बाळगावी,असे आवाहन केले. यावेळी बँक अध्यक्ष अजित नरके, कुंभी बँक मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. राऊत, मुख्याध्यापक, निवास वातकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com