चला पंचगंगा वाचवूया : पाडळी खुर्द, शिंगणापूर ग्रामपंचायतीचे दुसरे विधायक पाऊल

चला पंचगंगा वाचवूया : पाडळी खुर्द, शिंगणापूर ग्रामपंचायतीचे दुसरे विधायक पाऊल

Published on

16661
16702

पाडळी खुर्द, शिंगणापूर
घाटावर जलदिंडीचे स्वागत
कुडित्रे, ता.२१ ‘सकाळ‘च्या ‘चला वाचवूया पंचगंगा‘ उपक्रमांतर्गत राजर्षी शाहू कृतज्ञता जलदिंडीचे करवीर तालुक्यातील सर्व गावांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. पाडळी खुर्द (ता.करवीर ) येथे घाटावर स्वच्छता करण्यासह मांडव घालून, रांगोळी काढून स्वागत केले. यावेळी सरपंच तानाजी पालकर, पाडळी तंटामुक्त अध्यक्ष सीताराम पाटील, सई सोहनी, किशोर पाटील, शिवराज पाटील, माधुरी पाटील, प्रकाश पाटील, विजय पाटील, सचिन सोहनी, संदीप कांबळे, सूरज सुतार, मंगल पाटील, बालिंगा सरपंच मयूर जांभळे, दोनवडे सरपंच सारिका जाधव, सदस्य संभाजी पाटील, संजय पाटील, नवनाथ कदम, कुंडलिक पाटील, शारदा पाटील, वसंत पाटील, सर्व सदस्य, शिंगणापूर सरपंच प्रकाश रोटे, हणमंतवाडी सरपंच संग्राम भापकर, साबळेवाडी सरपंच जोती आंबी, उपसरपंच नामदेव पाटील, करवीरचे गटविस्तार अधिकारी जयवंत उगळे, विस्ताराधिकारी विजय नलवडे, संदेश भोईटे, ग्रामसेवक गायत्री जाखले, सरदार दिंडे, संभाजी पाटील, आर. आर.भगत आदी उपस्थित होते. आज पहिल्या दिवशी जलदिंडीचा शिंगणापूर येथे समारोप झाला.


01784
कसबा बीड ः येथील भोगावती नदी घाटावर ‘सकाळ''च्या जलदिंडीचे स्वागत करताना सत्यजित पाटील, दिनकर गावडे, सज्जन पाटील, मुकुंद पाटील, नामदेव माने आदी ग्रामस्थ.
--
16658

भोगावती, तुळशी संगमावर
बीड, महे, कोगेत जलकलशाचे पूजन

कसबा बीड, ता.२१ ः येथील भोगावती व तुळशी नदीच्या संगमावरील कसबा बीड घाटावर बीड व महे ग्रामपंचायतींतर्फे जलदिंडीचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी घाटावर स्वच्छता करून दोन्ही बाजूंनी रांगोळी घालून सुशोभित केले होते. जलदिंडीचे आगमन होताच जलकलशाचे पूजन दोन्ही गावांतील महिला सदस्या, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांनी केले. यावेळी कसबा बीडचे सरपंच दिनकर गावडे, माजी सरपंच सत्यजित पाटील, महे सरपंच सज्जन पाटील, शेतकरी संघटनेचे मुकुंद पाटील, भाजप शेतकरी आघाडीचे करवीर अध्यक्ष दादासाहेब देसाई, भ्रष्टाचार जन आक्रोश संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगदीश पाटील, एस. डी. जरग, ‘कोजिमाशि पतपेढी‘चे उपाध्यक्ष शिवाजी लोंढे, यंग ब्रिगेड सुवर्ण राजधानी मंडळाचे सूरज तिबिले, ग्रामविकास अधिकारी बी. एस. कांबळे, संदीप पाटील, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. कोगे खडक बंधाऱ्यावर कोगे व कुडित्रे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी जलदिंडीचे स्वागत केले. यावेळी दोन्ही ग्रामपंचायतींनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी शासनाने निधी द्यावा, याचे निवेदन ‘सकाळ''कडे दिले. यावेळी कोगेचे उपसरपंच बाजीराव निकम, विश्वास पाटील, ग्रामविकास अधिकारी बी. के. आंबेकर, कुडित्रे सरपंच जोत्स्ना पाटील, उपसरपंच राजाराम कदम, ग्रामविकास अधिकारी सरदार दिंडे, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व महिला व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com