दिवसा रुंद रात्री अरुंद

दिवसा रुंद रात्री अरुंद

Published on

03224, 03225

दिवसा रुंद अन् रात्री अरुंद
इचलकरंजीतील मुख्य मार्गावरील अतिक्रमण; वाहतुकीस अडथळा
इचलकरंजी, ता. १० : शहरातील मुख्यमार्ग दिवसा अतिक्रमणमुक्त होत असताना आता रात्रीचे अतिक्रमण वाढू लागले आहे. शाहू पुतळा ते राजवाडा चौक या मुख्य मार्गाला सध्या अचूकपणे प्रशासनाला शिस्त लावली. मात्र ही शिस्त दिवसाच दिसत आहे. रात्री रस्त्यांच्या दोन्ही बाजूला पार्किंग, पार्किंगच्या पुढे चारचाकी, रिक्षा आणि फेरीवाल्यांमुळे रस्त्यावरून केवळ एकच वाहन जाईल, अशी भयंकर स्थिती शहरात आहे. दिवस मावळला की अतिक्रमणधारकांचे मनोबल वाढले आहे.
रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि वाहतूक नियोजनाचा अभाव नागरिकांच्या जीवावर बेतू लागला. याच गांभीर्याने प्रशासनाने जागे होवून मुख्य मार्ग सुरक्षित केला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे, चौकाचौकात झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारले आहेत. त्यामुळे वाहतुकीला चांगली शिस्त लागली आहे. पण ही शिस्त रस्त्यावर वाहतूक पोलिस आणि प्रशासनाच्या सर्वसाधारण कामकाजाच्या वेळेपर्यंत असलेली दिसत आहे. आधी पांढरे पट्टे नसल्यामुळे कारवाई होताना सर्रास होणारे वादाचे प्रसंग थांबले आहेत. अतिक्रमणालाही चाप बसला आहे. दिवस उजाडल्यापासून मुख्य मार्गावरील पांढरे पट्टे असे दूरवर दिसतात. यामुळे वाहतुकीला शिस्त लागल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले. मात्र सायंकाळी सातनंतर हेच चित्र आता उलटे दिसत आहे.
रात्रीच्या वेळी शहरात मुख्य मार्गावर अतिक्रमण वाढत असून यामुळे रस्ता अरुंद होत आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी नित्याची बाब झाली आहे. शाहू पुतळा चौक, शिवतीर्थ चौक ते गांधी पुतळा चौक , मलाबादे चौक हा मुख्य रस्ता अरुंद झाला आहे. अनेक विक्रेते पांढऱ्यापट्याच्या पुढे थांबून मालाची विक्री करत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणारे ग्राहकही रस्त्यावरच थांबत आहे. त्यामुळे वारंवार रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. पादचाऱ्यांना तर रस्त्यावरून चालताना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे नगरपालिका व महसूल विभागाने मुख्य मार्गावरील सायंकाळी सहानंतर वाढणारी रात्रीची अतिक्रमणे काढण्याची गरज आहे.
- - - - - - - - - - - - - -

विक्रेते थेट रस्त्यावर
शहरात रात्रीच्यावेळी विक्रेत्यांची कमालच असते. कोणी काहीपण वस्तू घेऊन रस्त्यावर विक्रीस बसतो. पांढऱ्या पट्टा सोडून रस्त्यावर येतो. त्यानंतर वस्तू विक्रीसाठी ग्राहकांना आकर्षित करत हे विक्रेते थेट रस्त्याच्या मध्येच येताना दिसत आहेत. असे प्रकार रात्री मुख्य मार्गावर ठिकठिकाणी पाहायला मिळतात. हे प्रकार थांबले नाही तर वाहतुकीसाठी ही एक गंभीर समस्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com