
सावर्डे सोसायटी बिनविरोध
सावर्डे सोसायटी बिनविरोध
खोची : सावर्डे (ता. हातकणंगले) येथील शतकमहोत्सवी सावर्डे ग्रामविकास सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. संस्थेने जाहीर केलेल्या कच्च्या यादीतून अनेक पात्र सभासदांना वगळले होते. यावर सभासदांतर्फे हरकत घेतली होती. याची सुनावणी होऊन नव्याने सुमारे १८९ सभासद पात्र झाले. याचा परिणाम राजकीय समीकरणे बदलली. यामुळे संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बाळासाहेब चव्हाण, सुलभा चव्हाण, सुरेश चव्हाण, अण्णासाहेब पाटील, परशराम चव्हाण, पोपट चव्हाण आदींनी प्रयत्न केले. बिनविरोध संचालक असे ः सर्वसाधारण गट- सुरेश चव्हाण, अनिल चव्हाण, सचिन पाटील, दिलीप पोवार, बबन चव्हाण, प्रवीण चव्हाण, रणजित चव्हाण, महादेव चव्हाण. महिला गट- सुलभा चव्हाण, पवित्रा पाटील. अनुसूचित जाती गट- सुमित्र सावर्डेकर. इतर मागास गट- मन्सूर मोमीन, एन. टी गट- मारुती बुवा.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..