जीवनामध्ये सुरक्षितता महत्वाची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीवनामध्ये सुरक्षितता महत्वाची
जीवनामध्ये सुरक्षितता महत्वाची

जीवनामध्ये सुरक्षितता महत्वाची

sakal_logo
By

जीवनामध्ये सुरक्षितता महत्त्‍वाची
संजय कांबळे; इचलकरंजीतील नाईट कॉलेजमध्ये कार्यक्रम
इचलकरंजी, ता. २४ : मानवी जीवन खूपच धकाधकीचे होत चालले आहे. जीवनामध्ये सुरक्षितता महत्त्‍वाची असल्याने नैसर्गिक व मानवी आपत्ती आल्यानंतर आपली आणि समाजाची सुरक्षा महत्त्‍वाची असते, असे प्रतिपादन इचलकरंजी नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे यांनी व्यक्त केले.
देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्टस्‌ अँड कॉमर्समध्ये राष्ट्रीय सेवा योजना आयोजित ‘आग प्रतिबंधक उपाययोजना’ या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
आग प्रतिबंधक उपाययोजना, आग प्रतिबंधक साधनांचा परिचय, साधनांचा वापर, वापरण्याची पद्धती आदींविषयी मार्गदर्शन केले. इचलकरंजी नगरपालिका आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी तुषार हेगडे, संदीप वेदपाठक, राजमहम्मद शेख, सागर धूपदाळे, तात्यासो कांबळे यांनी आग प्रतिबंधक प्रात्यक्षिक करून दाखवली. आपत्तीवेळी योग्य शास्त्रीय पद्धतीने सामोरे कसे जावे याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष अरुणराव खंजिरे, प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत प्रा. मिलिंद दांडेकर यांनी केले. प्रास्ताविक डॉ. रामेश्वर सपकाळ यांनी केले. क्रीडा प्रशिक्षक डॉ. देवेंद्र बिरनाळे, प्रा. एस. एस. पाटील, डॉ. एस. एल. रणदिवे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. एफ. एन. पटेल यांनी केले. आभार प्रा. डॉ. माधव मुंडकर यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top