उदगावमध्ये विकास कामांचा प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उदगावमध्ये विकास कामांचा प्रारंभ
उदगावमध्ये विकास कामांचा प्रारंभ

उदगावमध्ये विकास कामांचा प्रारंभ

sakal_logo
By

02943
-------------------
उदगावमध्ये विकासकामांचा प्रारंभ
जयसिंगपूर, ता. २३ : उदगाव (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायत फंडातून गावातील ग्रामदैवत जोगेश्वरी यात्रा मार्गावरील रस्ते व गटर्स कामाचा प्रारंभ जिल्हा परिषेदेच्या माजी समाज कल्याण सभापती स्वाती सासणे व सरपंच कलीमुन नदाफ यांच्याहस्ते झाला. ३१ लाखांच्या निधीतून रस्ते व गटर्सची कामे पूर्ण होणार आहेत.
सौ. सासणे म्हणाल्या, ‘उदगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासकामे सुरू आहेत. सर्वच सहा प्रभागांत विविध विकासकामे होत आहेत. नागरिकांनी सहकार्य करून आणखीही कामे पूर्ण करून घ्यावीत.’ सरपंच कलीमुन नदाफ म्हणाल्या, ‘गत महिन्यात ६० लाखांच्या विकासकामांचा प्रारंभ केला होता. त्यातील बरीच कामे पूर्ण होत आहेत. ग्रामदैवत जोगेश्वरीची यात्रा एक महिन्यावर येऊन ठेपली असल्याने यात्रा मार्गावरील रस्ता व गटर्स करण्याचा ग्रामस्थांचा आग्रह होता तो आता लवकरच पूर्ण होणार आहे.’ गटनेते राजेंद्र मगदूम, बाळासाहेब कोळी, ग्रामपंचायत सदस्या दीपिका कोळी, सावित्री मगदूम, रुक्मिणी कांबळे, सुवर्णा सुतार, अरुण कोळी, सलीम पेंढारी, सुदर्शन मगदूम, बाचू बंडगर, शिवाजी जलपुरे, सुरगोंडा पाटील, बाळू कांबळे, बंडेश कोळी, मंगेश घाटगे, अनिल पाटील, अक्षय व्हराटे, रोहन खोत, गौरव गुरव उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top