बिद्री कारखाना ऊसपिक परिसंवाद..

बिद्री कारखाना ऊसपिक परिसंवाद..

Published on

मुरगूड : येथे बिद्री साखर कारखान्यातर्फे आयोजित ऊसपीक परिसंवादात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषिभूषण डॉ. संजीव माने. शेजारी अध्यक्ष के. पी. पाटील, विठ्ठलराव खोराटे व संचालक (छायाचित्र : राजू चव्हाण, मुरगूड.)

शास्त्रोक्त ऊसशेतीतून १०० टनांहून अधिक उत्पन्न
कृषिभूषण डॉ. संजीव माने; बिद्री साखर कारखान्यातर्फे ऊसपीक परिसंवाद

मुरगूड, ता. १० : शेतकऱ्यांनी आता मानसिकता बदलून आधुनिक तंत्रज्ञानासोबत सकारात्मक पद्धतीने विचार करण्याची गरज असून, जमिनीची सुपिकता, लागवडीची पद्धत, रासायनिक खतांची मात्रा, पाण्याचे व्यवस्थापन आणि पीक संरक्षण या पंचसूत्रीचा वापर शास्त्रोक् पद्धतीने केल्यास एकरी शंभर टनांपेक्षा जास्त ऊसाचे उत्पादन घेणे सहजशक्य आहे, असा सल्ला कृषिभूषण डॉ. संजीव माने यांनी दिला.
श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यातर्फे आयोजित शेतकऱ्यांच्या ऊसपीक परिसंवादात बोलत होते. उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक प्रवीणसिंह पाटील, प्रवीण भोसले, उमेश भोईटे, अशोक कांबळे, संचालिका अर्चना पाटील, दलितमित्र डी. डी. चौगले आदी प्रमुख उपस्थित होते.
कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांचा उच्चांकी ऊसदर दिल्याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला. डॉ. माने म्हणाले, ‘‘उत्पादन वाढीसाठी उसाच्या फुटव्यांचे योग्य नियोजन करावे. त्यांची वाढ व त्यांच्या संख्येवर नियंत्रण याचे नियोजन करून ऊस शेती करावी केल्यास उत्पादनात निश्चित वाढ मिळते.’’
अध्यक्ष पाटील म्हणाले, ‘‘येत्या हंगामात आम्ही प्रतिदिन ८ हजार मे. टनांपेक्षा अधिक गाळप करणार आहोत. यामुळे कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस गळितास आणता येणार आहे. सहवीज प्रकल्पाच्या यशानंतर डिस्टिलरी प्रकल्पाची उभारणी करत आहोत, यामध्येही निश्चितपणे यश येईल.
स्वागत कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी केले. प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक प्रवीणसिंह पाटील यांनी केले. कार्यक्रमास शेती अधिकारी बी. एन. पाटील, ऊस विकास अधिकारी उदयकुमार पाटील, संजय मोरबाळे उपस्थित होते. आभार संचालक प्रवीण भोसले यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com