
उष्णतेची लाट, आहार आणि आरोग्य
उन्हाळा त्रासविरहित घालवणे शक्य
वाढत्या उष्णतेबरोबरच आरोग्याच्या अनेक समस्या डोके वर काढत आहेत. दिनचर्येत बदल आणि योग्य व समतोल आहाराने हा उन्हाळा त्रासविरहित घालवणे शक्य आहे. ग्रामीण अथवा खुले परिसर असणाऱ्या ठिकाणांच्या तुलनेत शहरी भागामध्ये उष्णता अधिक असल्याचे आढळते. अश्या वेळेला दिनचर्येत काही साधे मात्र प्रभावी बदलांचा स्वीकार करणे गरजेचे आहे.
- सुयोग घाटगे
उन्हाळ्यामध्ये आदर्श आहार
सकाळचा नाश्ता
पोहे / उपीट/थालीपीठ + दही /थेपला +दही/ ओटसने बनवलेले पदार्थ/ इडली + साबंर / डोसा +चटणी
दुपारचे जेवण
कोशिंबीर एक ते दीड वाटी. यामध्ये काकडी, गाजर, कांदा, टोमॅटो, मुळा, बीट
वरीलपैकी कोणताही खाऊ शकता किंवा मिक्स करून कोशिंबीर तयार करणे दही सोबत. मोड आलेली कडधान्य एक वाटी. आवश्यकता वाटल्यास भुकेनुसार चपाती, भाजी किंवा डाळ, भात खावे रोज २ ग्लास ताक किंवा आंबील.
रात्रीचे जेवण
हलके असावे, साडे आठच्याआत जेवण करण्याचा प्रयत्न करावा. यामध्ये
गरम भाकरी, हिरव्या पालेभाज्या, दही यांचा समावेश असावा.
हे करावे
-एका वेळी जास्त प्रमाणात खाऊ नये.
-खाण्यात किमान दोन ते तीन तासाचे अंतर आवश्यक
-आहारात फळे, भाज्या अत्यंत आवश्यक
-दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी पिण्यात यावे
-रोज सात ते नऊ तास झोप घेणे गरजेचे आहे.
-३० ते ४५ मिनिटे चालणे गरजेचे
हे करू नये
-जास्त वेळ उपाशी राहणे
-जास्त चहा, कॉफी घेणे
-अति तेलकट, तुपकट पदार्थ खाणे
-साखर, मिठाचे पदार्थ खाणे टाळावे
कोट
अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे आरोग्याचा समतोल बिघडत आहे. व्यायाम, आहार याची योग्य सांगड घातल्यास शरीराचे होणारे नुकसान टाळू शकतो. सुदृढ व्यक्तींसाठी आहार आणि मधुमेह अथवा अन्य व्याधी असणाऱ्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहारात बदल करणे गरजेचे आहे. काही वेळेला समाजमाध्यमांवरील सल्ले घातक ठरू शकतात.
-प्रज्वला लाड, आहारतज्ज्ञ
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..