चंदगड तालुक्यात काजू, मसाला उत्पादनाला पोषक वातावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगड तालुक्यात काजू, मसाला उत्पादनाला पोषक वातावरण
चंदगड तालुक्यात काजू, मसाला उत्पादनाला पोषक वातावरण

चंदगड तालुक्यात काजू, मसाला उत्पादनाला पोषक वातावरण

sakal_logo
By

13122
सातवणे ः काजू व मसाला पिकावर आयोजित कार्यशाळेचे उद्‍घाटन करताना प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील आदी.

चंदगड तालुका काजू, मसाल्यासाठी पोषक
प्र. कुलगुरू डॉ. पाटील; सातवणे येथे शेतकरी कार्यशाळेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ७ ः चंदगड तालुक्यात काजू व मसाला पिकांसाठी पोषक वातावरण आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी व्यक्त केले. सातवणे (ता. चंदगड) येथील श्री छत्रपती शाहू महाराज शेतीमाल प्रक्रिया संस्थेच्या सभागृहात शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा झाली. या वेळी ते बोलत होते. माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील अध्यक्षस्थानी होते.
पश्‍चिम घाटाला संलग्न आणि घाटमाथ्यावरील चंदगड, आजरा तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. या विभागात विविध प्रकारची पिके उत्तम रीतीने उत्पादित होऊ शकतात. त्यासाठी संशोधन व्हावे. पिकांच्या लागवडीबाबत मार्गदर्शन व्हावे आणि उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी, असा सूर या कार्यशाळेत उमटला. डॉ. परशराम पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तालुक्यातील हवामान आणि त्याला पूरक आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकांचे उत्पादन व निर्यात याविषयी मार्गदर्शन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. व्यंकटेश हुबळी यांनी काजू निर्यातीचे महत्त्व सांगितले. देशात महाराष्ट्र काजू उत्पादनात अग्रेसर आहे; परंतु प्रक्रिया उद्योगांची संख्या, त्यांना लागणारा कच्चा माल विचारात घेता काजूचे उत्पादन वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. होमी चेरीयन यांनी मसाला पिकांचे उत्पादन आणि त्यातून मिळणारा आर्थिक नफा याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. ए. डी. जाधव, डॉ. बी. आर. साळवी, डॉ. आर. सी. गजभिये यांनीही मार्गदर्शन केले. काजू बोंडावर प्रक्रिया करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी द्यावी, अशीही मागणी केली. विविध पिकांचे उत्पादन, त्यावर प्रक्रिया, ब्रॅंडिंग आणि बाजारपेठ कशी मिळवायची, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. भरमूअण्णा पाटील यांनी या विभागात काजू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी करावा लागलेला संघर्ष आणि त्यानंतर त्याला मिळालेले यश, याविषयी माहिती दिली. या वेळी चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यांतील शेतकरी उपस्थित होते. मोहन परब यांनी आभार मानले.
--------------
कोट
औषधनिर्मितीमध्ये हळद व इतर मसाला पिकांना महत्त्व आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर मसाल्यांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यायला हवा.
- डॉ. होमी चेरीयन

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..