पृथ्वीराज चव्हाण
सरकार चालवण्यासाठी महागाई लादली
पृथ्वीराज चव्हाण यांचा मोदी सरकारवर आरोप; तर श्रीलंकेसारखी परिस्थिती
कोल्हापूर, ता. ७ ः ‘मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटले असून, पेट्रोल-डिझेलवरील वाढवलेल्या करातून सात वर्षांत २४ लाख कोटी गोळा केले आहेत. सरकार चालवण्यासाठी लागणारा खर्च काढण्यासाठी जनतेवर महागाई लादली आहे,’ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. आताच अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारने पाऊले उचलली नाहीत तर श्रीलंकेसारखी परिस्थिती येईल, असे सचिवांनी सांगितल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारासाठी ते कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
चव्हाण म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सध्याचे कच्च्या तेलाचे दर पाहता फार वाढ झालेली नसताना केंद्राने एक्साईज ड्यूटी वाढवून पैसे जमा करण्याचा सोपा मार्ग निवडला आहे. त्यामुळे सामान्य नागरिक महागाईने बेजार झाले असून, बांधकाम व्यावसायिकांवर दिवाळखोरी पुकारण्याची वेळ आली आहे. २०१७ पासून अर्थव्यवस्था घसरत असून, करवाढ कमी केली तरच महागाई कमी होणार आहे. याबाबत केंद्राने प्रथम निर्णय घ्यावेत, त्यानंतर राज्यातील निर्णय घेऊ. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, धार्मिक द्वेष पसरवून केवळ निवडणूक जिंकणे व सत्तेत जाणे हेच भाजपचे चालले आहे. लोकशाही मोडून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधी पक्षांना संपवण्याचे काम सुरू आहे. ही निवडणूक जिंकणार नसल्याचे माहीत झाल्यानेच भाजपने खालच्या पातळीवर टीका सुरू केली आहे. ऑनलाईन पैसे वाटले जाणार असतील तो पुरावाच मिळणार आहे. त्यांची यादी काढावी व कारवाई करावी.’’ यावेळी बाळासाहेब सरनाईक उपस्थित होते.
चौकट
ईडीचा उपयोग ब्लॅकमेल करण्यासाठी
राज्यातील आघाडी सरकारला अस्थिर करण्यासाठी संविधानिक पदावरील व्यक्तीकडून प्रयत्न करण्यात आले. त्यातून काही घडत नसल्याने ईडी, सीबीआय, प्राप्तिकरसारख्या आर्थिक चौकशी संस्थांचा ससेमिरा लावला जात आहे. आघाडीच्या नेत्याने कडक विधान केले की, ईडीची रेड पडते. आतापर्यंत २७०० रेड टाकल्या आहेत; पण एकातही अंतिम चौकशी नाही, चार्जशिट नाही, शिक्षा नाही. ईडीचा कायदा फक्त राजकीय नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरला जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.