‘महालक्ष्मी’च्या भाविकांना ‘हिरण्यकेशी’चे शुद्ध पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘महालक्ष्मी’च्या भाविकांना ‘हिरण्यकेशी’चे शुद्ध पाणी
‘महालक्ष्मी’च्या भाविकांना ‘हिरण्यकेशी’चे शुद्ध पाणी

‘महालक्ष्मी’च्या भाविकांना ‘हिरण्यकेशी’चे शुद्ध पाणी

sakal_logo
By

13224
गडहिंग्लज : महालक्ष्मी मंदिर आवारातील पाणी शुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण करताना बाबासाहेब वाघमोडे. शेजारी दिनेश पारगे, सुनिल चौगुले, राजेंद्र तारळे, गजेंद्र बंदी, अरुण कलाल, युवराज बरगे आदी.

‘महालक्ष्मी’च्या भाविकांना
‘हिरण्यकेशी’चे शुद्ध पाणी
गडहिंग्लजला सुविधा; ट्रस्ट व हिरण्यकेशी फौंडेशनचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ७ : येथील हिरण्यकेशी फाऊंडेशन व श्री देवी महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने महालक्ष्मीच्या भाविकांसह परिसरातील नागरिकांना शुद्ध पाण्याची सुविधा (आर.ओ. प्लँट) उपलब्ध करुन दिली. या प्लँटचे लोकार्पण प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते झाले. तहसीलदार दिनेश पारगे, हिरण्यकेशी फौंडेशनचे अध्यक्ष उद्योजक सुनिल चौगुले व ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तारळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंदिर आवारात आज हा कार्यक्रम झाला.
मान्यवरांनी मशिनमध्ये नाणी टाकून या शुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण केले. उद्योजक सुनिल चौगुले म्हणाले, हिरण्यकेशी फौंडेशन विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असते. दहा वर्षाच्या वाटचालीत वंचितांना आधार असो किंवा संकटकाळात कोणाच्याही मदतीसाठी धावून जाणे, नेहमीच सामाजिक बांधिलकी मानून फौंडेशन कार्य करीत आहे. भविष्यात प्रशासनाच्या मदतीने आणखीन विधायक उपक्रम राबवू.
ट्रस्टचे अध्यक्ष श्री. तारळे म्हणाले, श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी रोज शेकडो भाविक मंदिरात येतात. उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना शुद्ध पाण्याची सोय करण्याचा मानस व्यक्त केला. त्यासाठी हिरण्यकेशी फौंडेशन, पालिका प्रशासन व ट्रस्टींचे चांगले सहकार्य मिळाले. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
श्री. वाघमोडे व श्री. पारगे यांनी फौंडेशन व ट्रस्टीच्या विधायक कार्याचे कौतूक केले. भविष्यात पर्यावरण समतोलासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. राजू संकपाळ व आनंद सुतार यांचा सत्कार झाला. अनंत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ट्रस्टी सुरेश कोळकी यांनी आभार मानले. यावेळी गजेंद्र बंदी, सतीश ईटी, माजी उपनगराध्यक्ष कावेरी चौगुले, गौरी संकपाळ, नागेश कागे, अश्‍विनी मेहता, प्रशांत बाटे, अरविंद कित्तूरकर, अरुण कलाल, प्रकाश शहा, प्रशांत हिरेमठ, मल्लिकार्जुन बेल्लद, संदीप कोळकी, राजेंद्र मांडेकर, नरेंद्र भद्रापूर, अभियंता सुधीर पोतदार, युवराज बरगे, बसवराज आजरी, अशोक पाटील, सुधीर पाटील, म्हाळसाकांत देसाई आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..