निवडणूक प्रचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणूक प्रचार
निवडणूक प्रचार

निवडणूक प्रचार

sakal_logo
By

लोगो
-उत्तरचं रणांगण
-काँग्रेस, भाजप चिन्हे
-सरकारनामा
-

एकमेकांवर पाळत ठेवून प्रचाराचा धडाका

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील प्रचार टिपेला पोहोचला आहे. राज्यभरातील मातब्बर नेत्यांच्या सभांबरोबरच घरोघरी भेट देण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. महाविकास आघाडीबरोबर भाजप व वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी आपापल्या पातळीवर प्रचार करत आहेत. मात्र यात एकमेकांवर ‘पाळत’ ठेवण्याचा मुद्दा ठळकपणे पुढे येत आहे.
ज्या व्यक्ती आजारी आहेत, ज्या मतदानाला येऊ शकत नाहीत अशांची यादी भाजप व काँग्रेसच्या उमेदवार प्रचार यंत्रणेने काढली आहे. संबंधित व्यक्तींची पोस्टल मतदान करण्यासाठी मनधरणी करण्यासाठी कार्यकर्ते जात आहेत. त्यांची मोटार निघून गेली की अवघ्या तासभराच्या फरकाने प्रतिस्पर्धी उमेदवारांचे कार्यकर्ते त्याच आजारी व्यक्तीच्या घरी येतात. पोस्टल मतदान करा तेही आमच्याच उमेदवाराला करा, असा सल्ला देत आहेत. आठ दिवसांपासून उपनगरांत अशा आजारी व्यक्तींचा शोध घेत त्यांची मनधरणी करण्यासाठी कार्यकर्ते झटत आहेत.
राज्यात अनेक शहरांत येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यासाठी अनेकांनी आपल्या पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे किंवा मागण्याच्या तयारीत आहेत. अशा इच्छुक उमेदवारांना संबंधित पक्षाने येथे प्रचारासाठी आणले आहे. येथील निवडणुकीसाठी त्यांनी आपापल्या परिचित व्यक्ती किंवा तसेच पक्ष सांगतील तेथे जाऊन उमेदवाराचा प्रचार करण्यास सांगितले जात आहे.

चौकट
महिला आघाड्यांचाही जोर
महिला आघाडीचा वापर या प्रचारात सर्वाधिक होत आहे. सकाळी व सायंकाळीही महिलांचे गट उमेदवारांच्या प्रचाराची पत्रके वाटण्यासाठी घरोघरी जात आहेत. घरगुती स्वरूपात बैठक घेऊन उमेदवारांची माहिती दिली जात आहे. येत्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी घरगुती कार्यक्रमही नियोजित केले आहेत. त्यासाठी समाज माध्यमांचाही वापर केला जातो.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..