जाधव सुजित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाधव सुजित
जाधव सुजित

जाधव सुजित

sakal_logo
By

13331

क्रीडांगणांचा विकास करणार
पालकमंत्री सतेज पाटील; रूईकर कॉलनीत नागरिकांशी संवाद

कोल्हापूर, ता. ७ ः कोल्हापुरातील खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी कोल्हापुरातील क्रीडांगणांचा विकास करणार आहे. कोल्हापुरात चांगल्या दर्जाची क्रीडा सुविधा देणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
रुईकर कॉलनी येथे जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले,‘स्व. आमदार चंद्रकांत जाधव हे स्वतः खेळाडू होते, गांधी मैदान, बावडा व दुधाळी या मैदानांच्या विकासासाठी १८ कोटींचा व सासने मैदानासाठी ४ कोटी निधी मिळावा यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. हा निधी मिळावा यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. कोल्हापुरातील फुटबॉल संघांना सरावासाठी टर्फची मैदाने उपलब्ध करून देणार आहेत. यामुळे स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मैदानांवर सराव करायला आणि खेळण्याचा अनुभव मिळेल. खेळात करिअर घडविण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होईल. डी. वाय. पाटील ट्रस्टतर्फे फुटबॉल खेळाडूंचा पाच वर्षांसाठी आरोग्य विमा काढला जाणार आहे. आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील २५ एकर जागेवर क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे.
कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानाच्या विकासासाठी ४ कोटी ३६ लाख निधी दिला आहे. येथील सुविधांसाठी नगरोत्थान योजनेतून एक कोटी ४० लाखांचा नवीन प्रस्ताव दिला आहे. राज्य शासनाने विभागीय क्रीडा संकुलांना २५ कोटींऐवजी वाढवून ५० कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेतर्फे शास्त्रीनगर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट मैदानाला दोन कोटींचा निधी देण्यात येणार आहे. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टर्फचे कामही प्रगतीपथावर आहे.’

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..