जाहिरात बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरात बातमी
जाहिरात बातमी

जाहिरात बातमी

sakal_logo
By

कोल्हापूर महिला बँकेस
दीड कोटीचा नफा : सूर्यवंशी

कोल्हापूर, ता. ८ : कोल्हापूर महिला सहकारी बँकेस २०२१-२२ अहवाल वर्षात १ कोटी ५० लाख तरतुदीपूर्व नफा झाल्याची माहिती अध्यक्षा शैलजा सूर्यवंशी यांनी दिली. त्या म्हणाल्या की,
मार्च २०२२ अखेर बँकेचे भांडवल आणि निधी १५ कोटी, ठेवी ९५ कोटी, कर्जे ५२ कोटी, गुंतवणूक ५३ कोटी असून, खेळते भांडवल ११३ कोटी आहे. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण १६.७८ टक्के आहे. निव्वळ एनपीए प्रमाण ३.२४ टक्के असून लेखापरीक्षण वर्ग ‘अ’ आहे. दोन वर्षातील कोरोना परिस्थितीत उद्योग व्यवसाय बंद असल्याने बँकेचे कर्ज वितरण आणि थकबाकी वसुलीवर मर्यादा असूनही बँकेने व्यवसायवृद्धीत नियमितपणा ठेवला. बँकिंग, एटीएम, मोबाईल बँकिंग, पॉस, आयएमपीएस, ई-कॉमर्स आणि यूपीआय डिजिटल बँकिंग सेवा सुरू आहेत. माफक व्याजदराच्या महिला आणि पुरुषांकरिता विविध कर्ज योजना आहेत. आकर्षक व्याजदराच्या विविध ठेव योजना आहेत. ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर पाव टक्का जादा व्याज दिले जाते. सर्व शाखांकडे लॉकर सुविधा आहेत. बँकेच्या बिंदू चौक, हळदी, राजारामपुरी, गांधीनगर, हुपरी, खासबाग, शाहूपुरीत शाखा आहेत. बँकेने महिलांकरिता ९ टक्के व्याजाची चार चाकी वाहन खरेदी, इतरांकरिता ९.५० टक्के व्याजाची चारचाकी/दुचाकी वाहन खरेदी आणि ११.५० टक्के व्याजाची इतर वस्तू खरेदी कर्ज योजना सुरू केलेली आहे.
उपाध्यक्षा माधुरी शिंदे, संचालिका लतादेवी जाधव, मनीषा दमामे, जानकीदेवी निंबाळकर, सुनीता डोंगळे, भारती डोंगळे, तिलोत्तमा भोसले, सुधा इंदुलकर, मोहिनी घोटणे, मथुराबाई सुतार, जयश्री परमाळे, विजया जाधव, महाव्यवस्थापक जोतीराम कुंभार, सर्व अधिकारी, सेवकांच्या प्रयत्नातून वाटचाल सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top