कदम टुडे
१३५५६
विकासासाठी भाजपला साथ द्या
शौमिका महाडिक ः राजारामपुरी परिसरातील सभेत आवाहन
कोल्हापूर, ता. ८ ः पंचगंगा नदीत भरपूर पाणी आहे; पण सध्या शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होतो. रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल नागरिकांना आंदोलन करावी लागतात. महिलांसाठी शहरात कुठेही स्वच्छतागृहे नाहीत. शहरातील बागा, मैदाने दुर्लक्षित आहेत. आयटी पार्क सुरू झाला नाही. राजर्षी शाहूंचे जन्मस्थळ विकसित होत नाही. शहराचे प्रश्न सुटत नसतील, तर महापालिकेत नेतृत्व करणाऱ्यांना आणि पालकमंत्र्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे, त्यामुळे शहराच्या विकासासाठी भाजपला साथ द्या, असे आवाहन भाजपच्या जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले. उत्तरच्या पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ राजारामपुरी परिसरात आयोजित सभेत त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, ‘‘विकासाचा कोणताही मुद्दा नसल्यामुळे पालकमंत्र्यांकडून दिशाभूल केली जात आहे. मात्र घर कसे चालवायचे याची जाणीव असलेल्या महिला आता कोल्हापूर उत्तर मतदारसंघात विकास योजना कशा येतील, याबाबत निर्णय घेतील. त्यातून भाजपचा विजय निश्चित आहे.’’
भाजपच्या विकास धोरणाची माहिती त्यांनी दिली. ही निवडणूक कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठीसुध्दा निर्णायक असणार आहे. महाविकास आघाडीचा भ्रष्ट कारभार, मंत्र्यांचे घोटाळे, तीन पक्षांतील नेत्यांमधील भांडणे याला जनता कंटाळली आहे. कोणत्याही क्षणी हे सरकार कोसळेल अशी परिस्थिती आहे. अशावेळी भाजपच स्थिर आणि सक्षम सरकार देवू शकते. केंद्रात पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी विकासाची दृष्टी आणि देशाचा अभिमान दाखवून दिला आहे. त्यामुळेच देशभर भाजपचा विजयरथ धावतो आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये भाजपला विजयी करून कोल्हापूरला समस्यामुक्त करूया, असे आवाहनही महाडिक यांनी केले.
श्री. कदम म्हणाले, ‘‘नगरसेवक म्हणून प्रामाणिकपणे काम केले. आता कोल्हापूर उत्तरचा आमदार म्हणून संधी द्या, कोल्हापूरकरांना अभिमान वाटेल, असे काम करून दाखवू.’’
भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे, माजी नगरसेवक मुरलीधर जाधव, दीपक जाधव, दीपिका जाधव, संगीताताई खाडे, दिलीप कुरणे, शरद शिंदे, प्रसाद अथणे, सदाशिव खाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.