
राम नवमी शोभायात्रा
13975 (ओळी फोटोत)
-
13977 सजविलेल्या बग्गीमध्ये राम, सीता, हनुमान यांच्या वेशातील कलाकार
एक ही नाम, जय श्री राम
राम नवमी निमित्ताने शहरात भव्य शोभायात्रा; धनगरी ढोल ताशा, बँड पथकही
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ता. १० : एक ही नारा एक ही नाम, जय श्री राम जय श्री राम’ अशा जयघोषात हिंदुत्ववादी संघटनांतर्फे राम नवमी निमित्ताने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक सुरू झालेली ही शोभायात्रा पारंपरिक उत्साहात आणि ढोल ताशा, बँड बाजा, घोडे आणि लवाजम्यासह निघाली. या शोभायात्रेमध्ये रामभक्त महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दोन वर्षे कोरोनाच्या लाटेमुळे सर्व धार्मिक सण-उत्सवावर बंधने आली होती. यंदा ही सर्व बंधने संपल्यामुळे हिंदू महासभा, पतीत पावन संघटना, सेवावृत्त प्रतिष्ठान, हिंदू एकता, वंदे मातरम संघटना, शिवप्रतिष्ठान आदी हिंदुत्ववादी संघटनांतर्फे श्रीरामनवमी निमित्ताने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व हिंदुत्ववादी संघटनातर्फे श्रीरामांची २१ फुटी प्रतिमा उभी करण्यात आली. दुपारी श्रीरामांच्या ११ फुटी प्रतिमेसह शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेचा आरंभ विनायक माईनकर यांच्या उपस्थितीत झाला.
या शोभायात्रेच्या अग्रभागी धनगरी ढोल ताशा, बँड पथक होते. भगव्या साड्या नेसलेल्या महिला आणि भगवे स्कार्फ घेतलेले युवक मोठ्या संख्येने सामील झाले होते. सजविलेल्या बग्गीमध्ये राम, सीता, हनुमान यांच्या वेशातील कलाकार होते. शिवाजी चौकातून मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी ते महापालिका अशा मार्गावर फिरून शोभायात्रेच छत्रपती शिवाजी चौकात विसर्जन झाले. श्री राम नवमी निमित्ताने काढलेल्या या शोभायात्रेच्या आयोजनात बंडा साळुंखे, महेश उरसाल, उदय भोसले, सुदर्शन सावंत, अवधूत भाटे, प्रताप देसाई, सुनील पाटील, अनिरुद्ध कोल्हापुरे, केशव गोवेकर, गजानन तोडकर, राजेंद्र सूर्यवंशी, गौरी साळुंखे, धनश्री पेणकर, श्वेता कुलकर्णी, वृषाली हारुगले, सायली रांगोळे, किरण नकाते, संजय कारंडे आदींचा सहभाग होता.
चौकट
मोठा पोलिस बंदोबस्त
शोभायात्रेला आचारसंहितेमुळे सुरवातीला परवानगी नाकारण्यात आली होती. परंतु, पाच वाजेपर्यंत शोभायात्रा संपवायची या अटीवर परवानगी देण्यात आली. शोभा यात्रेसोबत छत्रपती शिवाजी चौकातून मोठा पोलिस बंदोबस्त होता. मिरजकर तिकटी येथे राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी हजर होती.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..