
सराफ संघ निवडणूक
सराफ व्यापारी संघासाठी
चुरशीने ९० टक्के मतदान
आज दुपारपर्यंत निकाल शक्य
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः सराफ व्यापाऱ्यांची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची निवडणूक मोठ्या चुरशीने झाली. त्यामध्ये ९० टक्के मतदान झाले. सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत सराफ संघाच्या महाद्वार रोड येथील कार्यालयात चौथ्या मजल्यावरील हॉलमध्ये मतदान झाले. एकूण ६८४ मतदारांपैकी ६११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
दोन वर्षांसाठी पदाधिकारी निवडीसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये एकूण १२ संचालक, एक अध्यक्ष व एक उपाध्यक्षपदासाठी मतदान झाले. अध्यक्षपदासाठी दुरंगी तर उपाध्यक्षपदासाठी तिरंगी लढत झाली. संचालकांच्या १२ जागांसाठी १८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उद्या (ता. ११) सकाळी नऊपासून सराफ संघामध्येच मतमोजणीस सुरुवात होईल. प्रथम संचालक मंडळ, त्यानंतर उपाध्यक्ष व शेवटी अध्यक्षपदाची मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कांतिलाल ओसवाल यांनी आज दिली. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ओसवाल यांच्यासह निवडणूक समितीचे विजय वशीकर, जवाहर गांधी, बिपीन परमार, सुरेश गायकवाड, नंदकुमार ओसवाल, कांतिलाल ओसवाल, उमेश जामसांडेकर, हेमंत पावरसकर यांनी मदत केली.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..