आजऱ्यासह परिसरात रामनवमी उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजऱ्यासह परिसरात रामनवमी उत्साहात
आजऱ्यासह परिसरात रामनवमी उत्साहात

आजऱ्यासह परिसरात रामनवमी उत्साहात

sakal_logo
By

आजऱ्यासह परिसरात
रामनवमी उत्साहात
आजराः आजरा तालुक्यात रामनवमी उत्साहात झाली. आजऱ्यापासून दिड किलोमीटर अंतरावरील रामतीर्थीवरील राम मंदिरात जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात झाला. या वेळी परंपरेनुसार विविध धार्मिक कार्यक्रम झाले. शहरातील राम मंदिरात दर्शनासाठी रामभक्तांची मोठी केली होती. रामतीर्थ येथील राममंदिरात पहाटे काकड आरती झाली. तिर्थ प्रसाद झाला. येथेही भाविकांची मोठी गर्दी होती. विलास नलवडे, प्रभाकर नेवरेकर, श्रेयश कोटकर व आजरेकर ग्रामस्थ व तरुण मंडळांनी यासाठी परिश्रम घेतले. शहरात मंदिरात संध्याकाळी पाच वाजता भावडेकर गुरुजी यांचे रामरक्षा प्रवचन झाले. सायंकाळी या परिसरात पावन खिंडी सिनेमा दाखवला जाणार आहे. या साठी रविंद्र केळकर, उदय आजरेकर, दिपक कुरुणकर, नेताजी बुरूड यासह रामदेव गल्ली तरुण मंडळातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेळप (ता. आजरा) येथेही रामजन्मोत्सव सोहळा झाला. पेरणोली येथील विठ्ठल मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी झाली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top