कदम टुडेत

कदम टुडेत

Published on

३ कॉलम

14031
महाविकास आघाडीला धडा शिकवा
केंद्रीय मंत्री रामदास आठवले ः सदरबाजार येथे प्रचार सभा
.........
कोल्हापूर, ता. १० ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सात वर्षे देशाची विकासाच्या दिशेने वेगवान वाटचाल सुरू आहे, अनेक नवनवीन योजना आणून मोदी सरकारने समाजातील प्रत्येक घटकाला दिलासा दिला आहे. संविधानाचा सन्मान करत, दीनदलितांना भाजप सरकारने न्याय दिला आहे. कोल्हापूर उत्तरमधील भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. शनिवारी सायंकाळी सदरबाजार येथे कदम यांच्या प्रचारासाठी आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. २०१९ मध्ये सत्तेसाठी दोन्ही कॉंग्रेसच्या मदतीने, शिवसेनेने भाजपला दगा दिला. त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने कोणतेही काम केले नाही. केवळ भ्रष्टाचार आणि घोटाळे करून, सर्वसामान्य जनतेचा पैसा लुटला. अशा महाविकास आघाडी सरकारला कोल्हापूरमधून भीम टोला द्या, असे आवाहन श्री. आठवले यांनी केले.
सभेला सदरबाजार, कदमवाडी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
श्री. आठवले म्हणाले, ‘‘केंद्रातील भाजप सरकारने नेहमीच समाजातील दीनदलित, दुबळ्या घटकांना न्याय दिला आहे. राष्ट्रपती या देशाच्या सर्वोच्च पदावर दलित समाजातील व्यक्तीला संधी दिली. कॉंग्रेसने आजवर दलितांच्या व्होट बँकेचा केवळ सत्तेसाठी वापर केला होता. कॉंग्रेस सरकारच्या काळातच दलितांवरील अन्याय अत्याचार वाढले.’’ या वेळी प्रा. शहाजी कांबळे, रूपा वायदंडे, उत्तम कांबळे यांच्यासह आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com