आजरा अर्बन बॅंकेच्या बांबवडे शाखेचे स्थलांतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा अर्बन बॅंकेच्या बांबवडे शाखेचे स्थलांतर
आजरा अर्बन बॅंकेच्या बांबवडे शाखेचे स्थलांतर

आजरा अर्बन बॅंकेच्या बांबवडे शाखेचे स्थलांतर

sakal_logo
By

14450
बांबवडे (ता. शाहूवाडी) ः येथील दि आजरा अर्बन बॅंकेच्या स्थलांतर व नवीन एटीएमच्या प्रारंभप्रसंगी ‘गोकुळ’चे संचालक कर्णसिंह गायकवाड. या वेळी डॉ. अनिल देशपांडे, अशोक चराटी व मान्यवर.


आजरा अर्बन बॅंकेच्या
बांबवडे शाखेचे स्थलांतर
आजरा, ता. ११ ः बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील दि आजरा अर्बन बॅंकेच्या शाखेचे नवीन जागेत स्थलांतराचा कार्यक्रम आणि नवीन एटीएम सेंटरचा प्रारंभ ‘गोकुळ’चे संचालक कर्णसिंह गायकवाड यांच्या हस्ते झाला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व जिल्हा बॅंकेचे संचालक सर्जेराव पाटील प्रमुख उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात ते म्हणाले, ‘‘बॅंक महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये कार्यरत आहे. १९९७ मध्ये बांबवडेत शाखा सुरू झाली. बँकेच्या एकूण ३२ शाखांपैकी एक आहे. बॅंकेने यंदा एक हजार २०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. परिसरात बॅंकेचा व्यवसाय चांगला असून, सर्वांचे सहकार्य मिळत आहे.’’ पाटील म्हणाले, ‘‘शाहूवाडी तालुक्यातील तळागाळातील लोकांना उद्योगधंद्यासाठी व शेतीसाठी कर्ज उपलब्ध करून बॅंकेने सहकार्य केले आहे. बॅंकेने तालुक्यासाठी मोठे योगदान दिले.’’ अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख व संचालक अशोक चराटी यांनी बॅंकेच्या वाटचालीचा आढावा घेतला. बॅंकेचे उपाध्यक्ष किशोर भुसारी व त्यांच्या पत्नी निरुपमा यांच्या हस्ते महापूजा पार झाली. संचालक सुरेश डांग, विलास नाईक, प्रकाश वाटवे, डॉ. दीपक सातोसकर, रमेश कुरुणकर, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फडके, प्रणिता केसरकर, शैला टोपले, अस्मिता सबनीस, सुनील मगदूम, सूर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण, अॅड. सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे, विठ्ठल तोडकर, अमृत वाकडे, अविनाश सोनटक्के, ज्ञानदेव महाडिक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top