शाहू फुले आंबेडकर सप्ताह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू फुले आंबेडकर सप्ताह
शाहू फुले आंबेडकर सप्ताह

शाहू फुले आंबेडकर सप्ताह

sakal_logo
By

डॉ. आंबेडकरांच्या
विचारांचा अभ्यास करा
प्राचार्य डॉ. भालेराव : शाहू महाराज स्मृति गोलमेज परिषद

कोल्हापूर,ता. १२ ः ‘आंबेडकरी विचाराने प्रेरित झालेली सामाजिक आणि राजकीय चळवळ ही मानवमुक्तीची चळवळ आहे, त्यांचा राजकीय लोकशाहीचा विचार अंगीकारून चळवळीला योग्य दिशा देणे आवश्यक आहे. डॉ आंबेडकर यांच्या विचारांचा कार्यकर्त्यांनी अभ्यास केला पाहिजे,’’ असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. हरीश भालेराव यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे झालेल्या फुले शाहू आंबेडकर सप्ताहांतर्गत राजर्षी शाहू महाराज स्मृति गोलमेज परिषद परिषदेत ते बोलत होते. ही परिषद आंबेडकरी विचाराने प्रेरित सामाजिक व राजकीय चळवळी यावर व्याख्यान आयोजित केले.
व्यंकाप्पा भोसले, प्रा.विनय कांबळे, दगडू भास्कर, बाबासाहेब वडगावकर, प्रा.जी.बी.आंबेडकर, प्रा.अशोक चोकाककर, प्रा.आण्‍णासो कांबळे, दिगंबर लोहार,
डॉ. शरद गायकवाड, नामदेव कांबळे, डॉ.विनोद पवार, प्रमोद कदम,डी.एस.डोने, बाळासाहेब मोमीन यांनी संघटनेची वाटचाल, चळवळी संदर्भातील भूमिका व दिशा स्पष्ट करण्यासाठी चर्चेच्या दोन फेऱ्यामध्ये मांडणी केली. प्रा. डॉ श्रीकृष्ण महाजन यांनी स्वागत केले. प्रा अविनाश भाले यांनी आभार मानले. डॉ दीपा श्रावस्ती यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top