बंदोबस्त
संवेदनशील भागात कडक बंदोबस्त
उत्तर पोटनिवडणूक; ड्रोनसह गस्तीपथकाचा वॉच; मतदान प्रक्रिया शांततेत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः पोटनिवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघासह संवेदनशील भागात आज कडक बंदोबस्त तैनात होता. मतदार केंद्रावर ड्रोनसह गस्तीपथकाचा वॉच आणि केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान तैनात होते. किरकोळ अनुचित प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत झाली.
उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज शहरातील ३५७ केंद्रावर मतदान झाले. आज सकाळी सहापासून कडक बंदोबस्त तैनात होता. प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर दोनशे मीटरवर बॅरेकेडस् लावली होते. त्याबाहेरच पक्षाचे बुथ उभारण्यास परवानगी दिली होती. ठराविक रंगांच्या बुथबाबत काही ठिकाणी हरकती घेतल्याने काही ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. पण पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
अधीक्षकांची भेट
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी प्रत्येक मतदान केंद्राला भेट दिली. संवेदशनशील मतदान केंद्रावर ते अधिक काळ थांबून होते. अधिकाऱ्यांना बंदोबस्ताच्या अनुषंगाने आवश्यक सूचना दिल्या जात होत्या. एखाद्या केंद्रावरून तक्रार आल्यास अवघ्या दोन चार मिनिटात पोलिसांची फौज तेथे पोहोचू शकेल असे नेटके नियोजन केले होते.
ड्रोन, गस्तीपथकाची मदत
संवेदनशील मतदान केंद्रांवर ड्रोन आणि व्हिडीओ शूटिंगची मदत घेतली जात होती. परिणामी केंद्राबाहेर उभे असणाऱ्या कार्यकर्त्यांची व बघ्यांची गर्दी हटत होती. वाहनांतून गस्ती पथकांची प्रत्येक केंद्रावर गस्त घालण्यात येत होती. त्यांच्याकडून नागरिकांना गर्दी न करण्याच्या सूचना देण्यात येत होत्या.
शस्त्रधारी पोलिस
प्रत्येक केंद्रावर केंद्रीय सुरक्षा बलाचे शस्त्रधारी जवानांचा बंदोबस्त तैनात होता. पोलिसांकडून फक्त मतदारांनाच मतदान केंद्रात सोडले जात होते. वाहतुकीच्या नियोजनासाठी अनेक केंद्राबाहेर वाहतूक पोलिसही तैनात होते.
नेत्यांचा संयम...
शहरातील एक दोन मतदान केंद्रावर नेते आणि कार्यकर्ते आमने सामने आल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रित आणली. त्याचवेळी प्रसंगावधान पाहून नेत्यांनी संयम दाखविल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.
दुपारनंतर बंदोबस्त टाईट...
सदर बाजार, विचारेमाळ, कदमवाडी, आठ नंबर शाळा अशा संवेदनशील मतदान केंद्रावर दुपारनंतर मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. अशा ठिकाणी शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, राजेश गवळी, दत्तात्रय नाळे, ईश्वर ओमासे, संतोष जाधव आदी फौजफाटा घेऊन बंदोबस्त बजावत होते. सदर बाजार परिसराला तर दुपारनंतर पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
सोशल मीडियावरही नजर
निवडणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्ताबरोबर सायबर पोलिस ठाण्याकडून सोशल मिडीयावर नजर ठेवण्यात आली होती.
कोट -
सर्व पोलिस अधिकारी आणि अमंलदारांच्या मेहनतीमुळे बंदोबस्त यशस्वी झाला.
शैलेश बलकवडे (पोलिस अधीक्षक)
असा होता बंदोबस्त...
पोलिस अधीक्षक - १
अपर पोलिस अधीक्षक - १
पोलिस उपअधीक्षक - १
पोलिस निरीक्षक - ६
सहायक पोलिस निरीक्षक/उपनिरीक्षक - २६
पोलिस कर्मचारी - ५०५
होमगार्ड - ६००
केंद्रीय सुरक्षा बल तुकडी - १
राज्य राखीव दल तुकडी - २
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.