झोपडपट्टी निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झोपडपट्टी निवेदन
झोपडपट्टी निवेदन

झोपडपट्टी निवेदन

sakal_logo
By

झोपडपट्टीवासीयांना
प्रॉपर्टी कार्ड द्यावे

कोल्हापूर, ता. २१ - शहरातील झोपडपट्टीवासीयांना प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यास प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजना अंतर्गत पक्की घरे बांधता येतील. त्यांची मुलभूत गरज लक्षात घेवून त्यांना प्रॉपर्टी कार्ड द्यावे, अशी मागणी उज्ज्वल कोल्हापूर संघटनेने आज महापालिका उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे, की कोल्हापुरातील महापालिका क्षेत्रामध्ये अधिकृत आणि अनधिकृत अशा एकूण 64 झोपडपट्ट्या असून, त्यामध्ये 15628 झोपड्या आहेत. या वस्त्यांमधील अंदाजे लाखभर नागरिक गेल्या चाळीस वर्षांपासून दाटीवाटीने राहतात असे प्रथमदर्शनी दिसून येते. मूलभूत गरज म्हणून निवारा ही गोष्ट अधोरेखित झाली असल्याने आपण उदार अंतकरणाने यावर निर्णय घेऊन कार्य करावे. अन्यथा संघटनेच्या वतीने महापालिका प्रशासनाच्या विरोधात उग्र आंदोलन छेडण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी. शिष्टमंडळात आनंद गुरव, गणेश लाड, अजित पाटील, गिरीष साळोखे, नितेश कुलकर्णी, राजाराम नरके, सचिन कदम, स्वप्निल चौगले आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top