चला, बिया गोळा करू या,रोपे तयार करू या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

collect seeds
बिया गोळा करू या चला

चला, बिया गोळा करू या,रोपे तयार करू या!

कोल्हापूर : निसर्गमित्र परिवार संस्थेतर्फे जागतिक वसुंधरा दिन, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त ‘चला, बिया गोळा करू या’ कृतिशील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दरवर्षी उन्हाळ्यात निसर्गात वृक्ष, वेली, झुडपांवर फळे परिपक्व होऊन बिया तयार होतात. दरवर्षीच्या हंगामात तयार होणाऱ्या बियांपासूनच नव्या रोपांची निर्मिती होत असते. यासाठी दरवर्षी ताजे बियाणे गोळा करणे महत्त्वाचे ठरते. सध्या सह्याद्री/पश्चिम घाट परिसरात गुळवेल, गारंबी, करांदा, गुंज, गोकर्ण, कोहळा, तांबडा भोपळा, कृष्ण कमळ, पॅशन फ्रूट, मायाळू, वाघाटी, घोटवेल, तोरण, नेर्ले, गोंदणी, पांढरा कुडा, मेंदी, अडुळसा, बंदुकीचा पाला, बहावा, पळस, काटे सावर, टेंभुर्णी, बेल, जारुळ, म्हाळुंगे, पपनस, खरशिंगी, जंगली आवळा, करंबळ, कदंब, भोकर, आपटा, शमी, वालुंज, वायवर्णा, सीता अशोक, फणस, पारिजातक, जांभूळ आदी वनस्पतींवर फळधारणा झालेली दिसत आहे.

आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करताना प्लास्टिक मोठ्या प्रमाणात गोळा होत असते. यातील प्लास्टिकच्या अनेक वस्तूंचा (उदा. पाण्याची बाटली, पेले, शेतीकामात रोपे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिकचे ट्रे, प्लास्टिकची दुधाची पिशवी) पुनर्वापर करून त्यात बिया रुजवून रोपे तयार करावीत. अशी रोपे संस्थेकडे जमा करावीत, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात येत आहे. येणाऱ्या पावसाळ्यात लोकसहभागातून ही रोपे दत्तक देण्यात येणार आहेत.

बिया रुजविणे, रोपे तयार करणे यासाठी प्रशिक्षण हवे असल्यास संस्थेमार्फत प्रत्येक रविवारी सायंकाळी पाच ते सात या वेळेत अनिल चौगुले, ‘बी’ वॉर्ड, महालक्ष्मीनगर येथे संपर्क साधावा. चला तर, बिया रुजवून, रोपे तयार करून वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण संरक्षण, संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकू या.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KolhapurSakalseed
go to top