ज्योती क्रांती परिषद
ओबीसी जनगणनेसाठी मुंबईत मोर्चा
कोल्हापूर, ता. २२ ः ओबीसींची जातनिहाय जनगणना तत्काळ करावी, यासह विविध मागण्यांसाठी ज्योती क्रांती परिषदेतर्फे मंगळवारी (ता. १७) मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, की स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण धोक्यात आले. या राज्यातील २७ हजार ७८२ ग्रामपंचायती, ३५१ पंचायत समिती, ३४ जिल्हा परिषद, ३६९ नगर परिषदा, पालिका; तर २७ महापालिकांतील सर्व मिळून ओबीसी आरक्षित ५६ हजार जागांना तांत्रिक अडचणी आल्या आहेत. पहिल्या मागासवर्गीय आयोगाने ओबीसीची स्वतंत्र जनगणनेची शिफारस केली होती. १९७८ मध्ये नियुक्ती केलेल्या मंडल आयोगाने २७ टक्के आरक्षणाची शिफारस केली होती. मात्र, आजवर आयोगाच्या शिफारशी स्वीकारलेल्या नाहीत. याविरोधात आवाज उठविण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
चौकट
मागण्या अशा...
मंडल आयोग जसाचा तसा लागू करा
भटक्या विमुक्त जमातीना आदिवासी एसटी प्रवर्गात समाविष्ट करा
छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक लवकर पूर्ण करा
मुस्लिम समाजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षण मिळावे
भटके विमुक्त ओबीसीसाठी स्वतंत्र बजेट देण्याचा कायदा करा
मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वरांचे स्मारक त्वरित पूर्ण करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.