सर्किट बेंच पालकमंत्री बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्किट बेंच पालकमंत्री बैठक
सर्किट बेंच पालकमंत्री बैठक

सर्किट बेंच पालकमंत्री बैठक

sakal_logo
By

१७००१
न्यायमूर्तींच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करू
पालकमंत्री सतेज पाटील; शेंडापार्कमधील जागा आरक्षित करण्याचीही घेतली जबाबदारी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी मुख्यमंत्री व उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींची भेट होणे आवश्‍यक आहे. ही भेट लवकरात लवकर व्हावी, यासाठी व्यक्तिशः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली. शेंडापार्क येथील जागा सर्किट बेंचसाठी आरक्षित करण्याचीही जबाबदारी घेत असल्याचेही स्पष्ट केले. खंडपीठ कृती समितीचे शिष्टमंडळ आज पालकमंत्री पाटील यांना भेटले. यावेळी ही ग्वाही दिली.
मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी विधान परिषद सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांना पाठवलेल्या पत्रात मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. त्या अनुषंगाने ही भेट लवकरात लवकर व्हावी, यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी आज खंडपीठ कृती समिती शिष्टमंडळास सांगितले. शेंडा पार्क येथील जागा सर्किट बेंचसाठी आरक्षित ठेवण्याचे काम ही माझी वैयक्तिक जबाबदारी समजून लवकरच ते काम पूर्ण करून घेत आहे असे, देखील त्यांनी यावेळी शिष्टमंडळास सांगितले.
शिष्टमंडळात खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आणि जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके, उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, सचिव ॲड. विजयकुमार ताटे - देशमुख, सहसचिव ॲड. संदीप चौगुले, लोकल ऑडिटर ॲड. संकेत सावर्डेकर यांच्यासह असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. दीपक पाटील ॲड. अशोक पाटील, ॲड. अजित मोहिते, ॲड संपतराव पवार यांच्यासह ॲड बी डी. शेळके, ॲड. व्ही. आर. पाटील, ॲड राजेंद्र मंडलिक, ॲड बी. आर. पाटील - अरळगुंडीकर, ॲड. ए एम पिरजादे, ॲड. इंद्रजित चव्हाण, ॲड. कर्णकुमार पाटील, ॲड.सुशांत शेळके, ॲड विक्रम पाटील, ॲड. विल्सन नाथन, ॲड. गिरीश नाईक, ॲड. विजय महाजन ॲड. प्रल्हाद लाड हे सर्व उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top