उद्योग, शेतीमध्ये करिअर शक्य ः डॉ. सागर देशपांडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योग, शेतीमध्ये करिअर शक्य ः डॉ. सागर देशपांडे
उद्योग, शेतीमध्ये करिअर शक्य ः डॉ. सागर देशपांडे

उद्योग, शेतीमध्ये करिअर शक्य ः डॉ. सागर देशपांडे

sakal_logo
By

17276
आजरा ः येथील गंगामाई वाचन मंदिरात आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. सागर देशपांडे. या वेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले, महादेव टोपले, राजेंद्र ठाकूर आदी.

उद्योग, शेतीमध्ये करिअर
शक्य : डॉ. सागर देशपांडे
स्वामी पतसंस्थेतर्फे आजऱ्यात व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २४ ः केवळ शिक्षणामध्ये करिअर घडवता येऊ शकते असा समज समाजात पसरला आहे. शिक्षण क्षेत्राशिवाय उद्योग, शेती व राजकारण यांसह विविध क्षेत्रातही उत्तम पद्धतीने करिअर घडवता येऊ शकते. त्यासाठी जिद्द, परिश्रम, चिकाटी हवी, असे प्रतिपादन डॉ. सागर देशपांडे यांनी केले.
येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात स्वामी विवेकानंद पतसंस्थेतर्फे आयोजित ‘करिअर घडवताना’ या विषयावर डॉ. देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी महादेव टोपले, राजेंद्र ठाकूर प्रमुख उपस्थित होते.
जनार्दन टोपले यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात ते म्हणाले, ‘‘संस्थेने यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने संस्थेतर्फे वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करणार आहे.’’ डॉ. देशपांडे म्हणाले, ‘‘करिअरबाबत शालेय जीवनापासून विचार करायला हवा. पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थीची आवड व त्यांच्यातील गुण हेरून त्याला योग्य ते मार्गदर्शन करायला हवे.’’
या वेळी मुकुंदराव देसाई, मलिककुमार बुरुड, सुधीर कुंभार, श्रीपाद कुलकर्णी, जी. एम. पाटील, सुरेश कुंभार, विजय राजोपाध्ये, शिवाजी इंजल, बंडोपंत चव्हाण, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. पतसंस्थेचे व्यवस्थापक अर्जुन कुंभार यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top