चंदगड पोलिस निरीक्षकपदी संतोष घोळवे रुजू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगड पोलिस निरीक्षकपदी संतोष घोळवे रुजू
चंदगड पोलिस निरीक्षकपदी संतोष घोळवे रुजू

चंदगड पोलिस निरीक्षकपदी संतोष घोळवे रुजू

sakal_logo
By

17188
चंदगड ः नूतन पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांचे स्वागत करताना पोलिस कर्मचारी.

चंदगड पोलिस निरीक्षकपदी
संतोष घोळवे रुजू
चंदगड ः येथील पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी संतोष घोळवे रुजू झाले. पोलिस कर्मचाऱ्यांनी बदली झालेले पोलिस निरीक्षक बी. ए. तळेकर यांना निरोप दिला, तर नूतन निरीक्षक घोळवे यांचे स्वागत केले. तळेकर यांची वडगाव पोलिस ठाण्याकडे बदली झाली. त्यांच्या जागी वडगावहून घोळवे यांची चंदगडला नियुक्ती करण्यात आली. तळेकर यांनी गेल्या दीड- दोन वर्षातील चंदगड तालुक्यातील कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. नतून निरीक्षक घोळवे यांनी या तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी प्रयत्नपूर्वक काम करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी सर्व पोलिस सहकारी, स्थानिक राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. महादेव जाधव, रावसाहेब कसेकर, आर. पी. किल्लेदार यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घोळवे यांचे स्वागत केले. नगराध्यक्षा प्राची काणेकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी घोळवे यांची भेट घेऊन स्वागत केले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top