
‘गंगामाई गर्ल्स’ मध्ये पुस्तक दिन
ich241
17216
इचलकरंजी : श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक पुस्तक दिन झाला.
‘गंगामाई गर्ल्स’मध्ये पुस्तक दिन
इचलकरंजी : श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक पुस्तक दिन पार पडला. विविध ग्रंथांचे रसग्रहण शिक्षकांनी केले. लेखक, कवी, नाटककार विल्यम शेक्सपीअर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर यांनी केले. समाजाचे मानसशास्त्र पुस्तक वाचनातून समजते. शाळेचे ग्रंथालय समृद्ध असेल तर शाळा समृद्ध होते, असे मत श्रीमती गोंदकर यांनी व्यक्त केले. क्रीडा शिक्षक प्रा. शेखर शहा यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे ‘प्लेयिंग इट माय वे’ रसग्रहण केले. ग्रंथपाल सौ. एस. एस. नेजे यांनी लेखक अरविंद जगताप यांच्या पत्रास कारण की या पुस्तकाचे रसग्रहण केले. प्रा. ए. एम. सावंत यांचा निवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार केला. उपप्राचार्य आर. एस. पाटील, उपमुख्याध्यापिका सौ. एस. एस. भस्मे, पर्यवेक्षक व्ही. एन. कांबळे उपस्थित होते.
---------
ich242.jpg
17217
इचलकरंजी : प्री स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी प्रा. डॉ. अमर कांबळे, डॉ. सौ. सपना आवाडे.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
इचलकरंजी : डीकेटीई सोसायटीच्या मराठी मेडियम हायस्कूलमध्ये चौथी प्री स्कॉलरशिप परीक्षा झाली. कै. सौ. इंदुमती आवाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शहर व परिसरातील अकरा केंद्रांवर ही परीक्षा झाली. परीक्षेसाठी एक हजार ७६० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक येथे केला. प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. डॉ. अमर कांबळे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव डॉ. सौ. सपना आवाडे होत्या. मुख्याध्यापक एन. एच. गाडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विविध शालेय स्पर्धा परीक्षेतील राज्य, जिल्हा, केंद्र स्तरावरील गुणवंतांचा सत्कार केला. सूत्रसंचालन पी. टी. शिंदे व सौ. व्ही. आर. चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन श्री. बंडगर व श्री. बचाटे यांनी केले.
--------
विशाल विद्यालयाचे यश
इचलकरंजी : विशाल विद्यालयाने मौज मस्ती मॅथ्स परीक्षेत यश मिळवले. प्रो ॲक्टीव्ह ॲबॅकस सेंटरद्वारे ही परीक्षा घेतली. विद्यालयातील तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत यश संपादन केले. चौथीतील श्रेयस भस्मे, मयूरेश जाधव, पूनम पवार, अपूर्वा मांगुरे, ओम वडे, वेदिका नाईक, श्रृतिका राऊत तसेच तिसरीतील आराध्या करमे, समिक्षा मुकटे, श्रृती रसाळ, अथर्व देशिंगे, सुदर्शन म्हेत्रे, वल्लभ वाकाले, शुभम रसाळ या विद्यार्थ्यांना गौरवले. मुख्याध्यापक संदीप सकपाळ, सौ. कदम, सौ. देशिंगे यांचे मार्गदर्शन लाभले. वसंत कुवर, सौ. सुरेखा कदम, सौ. प्रियंका कांबळे, आशा देशिंगे यांसह विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
---------
श्रावणी चौगुले प्रथम
इचलकरंजी : येथील मथुरा विद्यामंदिरातील श्रावणी चौगुले हिने दक्षिण महाराष्ट्र मँचेस्टर प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळवले. पहिलीत शिकणाऱ्या श्रावणीने परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिला मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, प्रज्ञा शोध परीक्षा विभागाचे शिक्षक यासह आई वडिलांचे मार्गदर्शन लाभले.
-------
मुख्याध्यापक आळतेकरांचा सन्मान
इचलकरंजी : येथील साई इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक आर. एन. आळतेकर यांना महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनमार्फत आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित केले. हा सोहळा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात झाला. गेली ३२ वर्षांतील इंग्रजी माध्यमातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, सचिन अहिर आदींच्या उपस्थितीत पुरस्कार दिला.
---------
विद्यार्थी शुभचिंतन कार्यक्रम
इचलकरंजी : कै. सौ. डॉ. जया आदिनाथ चौगुले प्राथमिक विद्या मंदिर, आदिनाथ पिराप्पा केटकाळे बाल विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने चौथीतील विद्यार्थ्यांचा शुभचिंतन कार्यक्रम झाला. मुलांनी शाळेसाठी भेट वस्तू प्रदान केली. संस्थेचे खजिनदार रवींद्र पाटील अध्यक्षस्थानी होते. कृष्णा अडकिल्ला यांच्याहस्ते दीपप्रज्वलन झाले. सुहास रूग्गे, रिटा रॉड्रीक्स, वर्षा हुल्ले, पी. जे. बडबडे, सुभाष काडाप्पा, एम. डी. लाडगे, तानाजी कांबळे आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..