
17218
कडगाव : ४५ वर्षांनंतर स्नेहमेळाव्यानिमित्त एकत्र आलेले वर्गमित्र.
कडगावला ४५ वर्षांनी
एकत्र आले वर्गमित्र
गडहिंग्लज, ता. २४ : कडगाव (ता. गडहिंग्लज) येथे ४५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र आले. त्यांचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. दरम्यान, काही शिक्षक व वर्गमित्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रार्थना झाल्यानंतर मेळाव्याला प्रारंभ झाला.
न्यू इंग्लिश स्कूलमधील १९७५ मधील दहावीच्या बॅचच्या वर्गमित्रांनी या स्नेहमेळाव्याला हजेरी लावली होती. सुरेश पाटील, मारुती कसाळे, राजेंद्र जामदार, विजय वडके, मंगल वडके, विमल हुडले, बाबू कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब देसाई, वसंत वांद्रे, रामचंद्र पाटील, अशोक पाटील, सदानंद हिरेमठ, विलास पाटील, संभाजी पाटील, रामचंद्र कांबळे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. उपस्थित महिलांची ओटी भरण्यात आली. ज्या शाळेत आपण शिक्षण घेतले त्या शाळेसाठी निधी जमा करण्यात आला. हा निधी भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. या वेळी राष्ट्रपती पदक विजेते विलास पाटील, नौदल अधिकारी संभाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. रामचंद्र कांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर विलास पाटील यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.