
येणेचवंडीच्या शाळेतील स्काऊट पथकाचा सत्कार
17219
इचलकरंजी : येणेचवंडी शाळेतील स्काऊट कब मास्टर भीमराव तराळ यांच्यासह पथकाचा गौरव करताना आशा उबाळे. शेजारी रंजना शिंदे, सुषमा भोसले, संतोष कोळी आदी.
येणेचवंडीच्या शाळेतील
स्काऊट पथकाचा सत्कार
गडहिंग्लज, ता. २४ : भारत स्काऊट गाईड अंतर्गत इचलकरंजी येथे झालेल्या चतुर्थ चरण चाचणी परीक्षेत येणेचवंडी प्राथमिक शाळेचे कब मास्टर भीमराव तराळ व त्यांच्या पथकाने चांगले यश मिळविल्याबद्दल शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्या हस्ते सत्कार झाला. परीक्षेतील सर्व उपक्रमांत स्काऊटनी भाग घेतला. तोंडी, लेखी, प्रात्यक्षिक स्वरुपाची परीक्षा झाली. यात येणेचवंडी शाळेतील आर्यन गोणी, सत्यजित नंदनवाडे, अभिजित बिरंजे, आदित्य शिंत्रे, नितीन रेडेकर, स्वराज्य पाटील या मुलांनी उत्कृष्ट सादरीकरण करुन यश मिळविले. शिबिरप्रमुख रंजना शिंदे, जिल्हा संघटन आयुक्त सुषमा भोसले, संतोष कोळी, संजय रेंदाळकर, अमरसिंह माने, मुख्याध्यापक प्रकाश शिंदे, मंगेश खोत उपस्थित होते. पालकांसह मारुती कोलूनकर, अनिल गोणी, विनायक पोवार यांचे सहकार्य मिळाले. गटशिक्षणाधिकारी एन. बी. हालबागोळ, मुख्याध्यापक काशिनाथ साखरे, सरपंच भारत झळके, उपसरपंच तानाजी कुराडे, ग्रामसेवक विजय जाधव, शाळा समिती अध्यक्ष प्रशांत भोसले यांनी पथकाचे कौतुक केले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..