
मुंबईतच घरे मिळावीत, कामगारांची मागणी
17266
गडहिंग्लज : गिरणी कामगार व वारसदारांच्या मेळाव्यात बोलताना उदय भट. शेजारी अमृत कोकितकर, बी. के. आंब्रे, अतुल दिघे आदी.
मुंबईतच घरे मिळावीत
गिरणी कामगारांची भूमिका कायम; गडहिंग्लजला मेळावा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ : मुंबई गिरणी कामगार व त्यांच्या वारसदारांचा मेळावा झाला. आपल्याला मुंबईतच घरे मिळावीत ही भूमिका गिरणी कामगारांनी कायम ठेवली. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. सर्व श्रमिक संघातर्फे येथील भडगाव मार्गावरील राम मंदिरात हा मेळावा झाला.
कामगार नेते अतुल दिघे म्हणाले, ‘‘कोरोनामुळे लढ्यात थोडा खंड पडला होता. पण, लढ्याची पुढील दिशा ठरवून जोमाने तयारी करावी लागेल. गिरणी कामगार व वारसदारांचे पुनर्वसन मुंबईत झाल्याशिवाय लढा थांबणार नाही.’’ उदय भट म्हणाले, ‘‘गिरणी कामगारांच्या हिताचा विचार करून त्यांच्या हक्काची घरे मुंबईतच द्यावीत. पनवेलसारख्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या घरांना विरोध आहे. आमचे पुनर्वसन मुंबईतच करावे.’’
शांताराम पाटील यांनी स्वागत केले. पद्मिनी पिळणकर यांनी प्रास्ताविकात मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला. बी. के. आंब्रे, अमृत कोकितकर, संतू दावणे, नारायण भंडागे, तानाजी कुरळे, गोपाळ गावडे, दौलत राणे, नारायण राणे, निवृत्ती मिसाळ यांची भाषणे झाली. मेळाव्याला गिरणी कामगार, वारसदार उपस्थित होते. रामजी देसाई यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..