अनंत घोटगाळकर पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनंत घोटगाळकर पुरस्कार
अनंत घोटगाळकर पुरस्कार

अनंत घोटगाळकर पुरस्कार

sakal_logo
By

१७२७०

अनंत घोटगाळकर
यांना अनुवादासाठी पुरस्कार
कोल्हापूर ः बॅरिस्टर नाथ पै यांच्या चरित्राचा अनंत घोटगाळकर यांनी मराठी अनुवाद केला असून त्याला पुणे येथील महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा उत्कृष्ट अनुवादासाठीचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. प्रसिध्द संसदपटू बॅ. नाथ पै यांचे चरित्र आदिती पै यांनी इंग्रजी भाषेत लिहिले आहे. आदिती यांनी श्री. घोटगाळकर यांना विनंती केल्यानंतर त्यांनी मराठी अनुवादाचे काम पूर्ण केले. गेल्या वर्षी हा अनुवाद पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाल्यानंतर सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्रावरून या पुस्तकाचे क्रमशः अभिवाचन केले आणि त्या माध्यमातून हे पुस्तक सर्वदूर पोचण्यास मदत झाली. आता १८९४ ला टिळक, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, हरी नारायण आपटे अशा दिग्गजांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा उत्कृष्ट अनुवादासाठीचा पुरस्कार या पुस्तकास देण्याचा निर्णय डॉ.गो.बं. देगलूरकर यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी मंडळाने घेतला आहे. श्री. घोटगाळकर हे निवृत्त शिक्षक असून इंग्रजी, मराठी या भाषांवर त्यांचे उत्तम प्रभुत्व आहे.

०२२४१
हनूमान दूध संस्था अध्यक्षपदी कदम
माजगाव - पडळ (ता.पन्हाळा) येथील हनूमान दूध संस्थेच्या अध्यक्षपदी सरदार पंडीत कदम तर उपाध्यक्षपदी विशाल बाबूराव कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. संचालक वसंत कदम, सरदार कदम,शिवाजी मोरे, जयवंत पाटील, भिमराव परीट, निलेश लोहार, रंगराव मस्कर, आशाताई चोपडे, कमल तोडकर, पोपट निकम, बाजीराव नांगरे, अभिनंदन पोवार, विष्णू चौगले,संग्राम पवार, दिगंबर शिंदे, सी.बी.कदम आदी उपस्थित होते.

कोडोली बँकेला ६८ लाख नफा ; पाटील
कोडोली : येथील कोडोली अर्बन को.ऑप बँकेला गेल्या आर्थिक वर्षात ६८ लाख ढोबळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, सध्या बँकेच्या मुख्य कार्यालयासह आठ शाखा जिल्हात कार्यरत आहेत. बँकेच्या सर्व आठ शाखा मार्चअखेर नफ्यात आहेत. वसुल भागभांडवल २ कोटी ४९ लाख असून ३६ हजार सभासद आहेत. तर रिझर्व्ह व इतर फंडस् ६ कोटी ६० लाख आहेत. या आर्थिक वर्षात ठेवी व कर्जात वाढ होऊन ठेवी ६५ कोटी २६ लाख तर कर्जे ३९ कोटी ५२ लाख आहेत. ‘सीडी‘ रेशो ६०.५६ टक्के आहे. रिझर्व्ह बँक नॉर्मसप्रमाणे ‘एनपीए‘ ५.६२ टक्के तर नेट एनपीए शून्य टक्के राखण्यात बँक यशस्वी झाली आहे. गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील, सर्व संचालक मंडळ व कर्मचारी यांचे यासाठी सहकार्य मिळाल्याचे सांगितले.

गगनबावडा पर्यटन विकासाबाबत
मंत्री पाटील यांना निवेदन
गगनबावडा ः गगनबावडा पर्यटन विकास व्हावा, जेणेकरून पर्यटकांचा ओढा वाढेल, रोजगार उपलब्ध होईल, तसेच धामणी प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा. यामुळे गगनबावडा, राधानगरी तालुक्यातील शेतकरी सावरू शकतील, अशा मागणीचे निवेदन गगनबावडा तालुका राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना दिले. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार अरुण लाड, जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, गगनबावडा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, विवेकानंद सनगर,भिवाजी वरेकर,सागर पाटील, सायरा जमादार,अनिल लटके, दीपक पाटील, सोनाजी पाटील, सुहास गायकर, उत्तम वरेकर, विश्वास मेहतर आदी उपस्थित होते.

01055

आसमा अत्तार यांना पीएच.डी.
सरुड ः बांबवडे (ता.शाहूवाडी) येथील प्रा.आसमा आतिक अत्तार यांना शिवाजी विद्यापीठाची समाजशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी प्राप्त झाली.
त्या सरुड येथील शिव-शाहू महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी''कोल्हापूर जिल्ह्यातील लघू उद्योगातील काम करणाऱ्या महिलांचा अभ्यास''या विषयावर शोधप्रबंध सादर केला. त्यांना डॉ.पी.बी.देसाई यांचे मार्गदर्शन तर संस्था अध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.जगन कराडे, प्रा.सुगतकुमार बनसोडे, प्राचार्य व सर्व प्राध्यापक वर्ग यांचे सहकार्य लाभले.

कागल येथे व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबीर
कागल : येथील शाहू हायस्कूल,ज्युनिअर कॉलेज क्रीडांगण येथे मुलामुलींसाठी उन्हाळी मोफत व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. क्रिडा विकास फांउडेशन,कागल यांचेकडून ता. २५ एप्रिल ते ८ मेअखेर असणार आहे अशी माहिती राष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच महेश शेडबाळे, प्रविण मोरबाळे व चंद्रकांत कासोटे यांनी दिली. या आधीच्या प्रशिक्षणामुळे अनेक राज्य, राष्ट्रीय, विद्यापीठ खेळाडू घडले आहेत. असे त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top