रवळनाथ मंदिर परिसराच्या सुशोभिकरणासाठी ५० लाख ः मंत्री मुश्रीफ सुशोभिकरणासाठी ५० लाख ःमंत्री मुश्रीफ
17304
गवसे (ता. आजरा) ः येथील ग्रामदैवत श्री. रवळनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार करताना ग्रामस्थ. या वेळी मुकुंदराव देसाई, सुधीर देसाई, अनिकेत कवळेकर आदी.
रवळनाथ मंदिर परिसराच्या
सुशोभीकरणासाठी ५० लाख
मंत्री मुश्रीफ यांची घोषणा; गवसेत कलशारोहण समारंभ
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २४ ः येथील ग्रामदैवत श्री. रवळनाथ मंदिर परिसराचे सुशोभीकरणासह गावातील विकासकामांसाठी पन्नास लाखांचा निधी देणार असल्याचे घोषणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
गवसे (ता. आजरा) ग्रामस्थांच्या लोकनिधीतून बांधलेल्या ग्रामदैवत श्री. रवळनाथ मंदिराचा कलशारोहण समारंभ झाला. या वेळी मंत्री मुश्रीफ बोलत होते. अॅड. वामन चंद्रू पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘गवसे येथील श्री. रवळनाथ देवालयाचा या पंचक्रोशीतील जागृत देवस्थान म्हणून लौकिक आहे. ४० लाख रुपये लोकवर्गणीतून बांधलेले मंदिर व ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद आहे. या मंदिरासाठी व गावातील अन्य विकासकामांकरिता पन्नास लाखांचा निधी देणार आहे.’’ या वेळी आजरा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, जिल्हा बॅंकेचे संचालक सुधीर देसाई, पंचायत समितीचे माजी सभापती उदयराज पवार, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिकेत कवळेकर, माजी सभापती रचना होलम, राजाराम होलम, वामन पाटील, महादेव हेब्बाळकर, पांडुरंग पाटील, लक्ष्मण पाटील, सहदेव नेवगे, शिवाजी पाटील, तातोबा पाटील यासह विविध संस्थाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
----------------
चौकट
...तर आम्ही भाग्यवान असतो...
माजी प्राचार्य लक्ष्मण पाटील म्हणाले, ‘‘ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे नेतृत्व सर्वसमावेशक आहे. आमचे गाव त्यांच्या मतदारसंघात असते, तर आम्ही अधिक भाग्यवान ठरलो असतो. मतदारसंघात गाव नसूनही त्यांना या गावासाठी दाखवलेली आत्मियता व आपुलकी मोठी आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.